Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

पायांमध्ये होणारी जळजळ ही सामान्य समस्या समजून दुर्लक्षित केली जाते. मात्र हा त्रास सतत होत असेल तर तो शरीरातील पोषक घटकांची कमतरता किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकतो. या समस्येकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 08:15 PM
पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेकदा शरीरात आवश्यक पोषक घटक कमी झाल्यास पायांमध्ये जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
  • पायांमध्ये सतत जळजळ होणे हे कधी कधी शरीरातील इतर गंभीर समस्यांचेही लक्षण असू शकते.
  • दैनंदिन सवयी, औषधांचे परिणाम किंवा बाह्य घटकांमुळेही पायांमध्ये जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.
पायांना जळजळ होणारी बाब आपण अनेकदा हलक्यात घेतो. पायांना जळजळ होणे एक सामान्य गोष्ट असली तरी हा त्रास जर सतत जाणवत असेल तर तुम्ही खबरदारी घेणे फार गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, किरकोळ वाटणारी ही समस्या गंभीर आजाराचा धोकाही वाढवू शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की ही समस्या शरीराच्या इतर भागांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण करू शकते.

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

दैनंदिन जीवनात आरोग्याच्या अनेक किरकोळ समस्यांना आपण सामोरे जात असतो. सामान्य गोष्ट समजून अनेकदा गंभीर आजाराच्या लक्षणांना आपण दुर्लक्षित करत असतो. पायांशी संबंधित अनेक आजार आहेत जे लोकांना त्रास देतात. अशीच एक समस्या म्हणजे पायांमध्ये जळजळ होणे. पायांमध्ये सतत होणारी ही जळजळ नक्की कोणत्या कारणामुळे होत असते ते तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की याचे मूळ कारण व्हिटॅमिन बी, फॉलिक ॲसिड किंवा कॅल्शियमची कमतरता असू शकते. ही समस्या केवळ विशिष्ट वयोगटातील लोकांनाच नाही तर कोणत्याही वयोगटातील लोकांना त्रास देऊ शकते.

पायांना जळजळ येण्याची कारणे?

  • पायांना जळजळ येणे सौम्य ते गंभीर असू शकते. पाय जळणे हे बहुतेकदा मज्जासंस्थेतील नुकसान किंवा बिघाडामुळे होते.
  • शरीरात विटामिन B12, B6 किंवा B9 ची कमतरता असल्यास पायांवर जळजळ होऊ लागते किंवा पायांना मुंग्या येऊ लागतात.
  • अल्कोहोलचे अतिसेवन, विषारी पदार्थ किंवा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे नसा खराब होतात. याचा मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो आणि पायांमुळे जळजळ जाणवू लागते.
  • जर तुम्हाला किडनीसंबंधित कोणता आजार असेल तर पायांना जळजळ होणे स्वाभाविक आहे.
  • जर थायरॉईड संप्रेरकाची पातळी कमी असेल तर पायांमध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
    बुरशीजन्स संसर्गामुळेही पायांत जळजळ निर्माण होते.
  • जर एखाद्या व्यक्तीला रक्तवाहिन्यांमध्ये संसर्ग झाला असेल तर त्याला पायात जळजळ किंवा तीव्र जळजळ देखील होऊ शकते.
  • पायांमध्ये होणारी ही जळजळ तीव्र स्वरुपात असेल आणि सतत होत असेल तर तुम्ही वेळीच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

पायांची जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय

  • पायांमध्ये होणारी जळजळ फार त्रासदायक असेल तर तिला रोखण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
  • जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर एक चांगला पर्याय ठरेल. दिवसातून एकदा काही मिनिटे आपले पाय थंड पाण्यत टाकून ठेवा.
  • कोमट किंवा थंड पाण्यात एप्सम सॉल्ट घालून पाय भिजवावे, यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
  • पायांची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाने पायांची मसाज करु शकता, यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
  • हळद आणि कोरफडीचा लेप तयार करुन पायांवर लावा. हळदीमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे जळजळ कमी होते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Burning sensation in feet know causes symptoms home remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
1

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर…
2

Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर…

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल
3

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! ‘या’ पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब
4

१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! ‘या’ पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.