हाडांना मजबूत बनवू शकते अंजीरचे सरबत (फोटो सौजन्य - iStock)
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने शरीराची ऊर्जा देखील कमी होऊ लागते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी द्रवपदार्थ पिण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत बहुतेक लोक नारळ पाणी, लिंबू पाणी, रस इत्यादींचे सेवन करतात. उन्हाळ्यात शरीराचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही अंजीरचा रस पिऊ शकता. अंजीरचा रस आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर की अंजीरचा रस नक्की कसा काढायचा? अंजीरच्या रसाचे फायदे काय आहेत? NIH ने दिलेल्या अहवालानुसार आपण याबाबत अधिक माहिती घेऊया, ज्यामुळे तुम्हाला शरीराला अधिक फायदा करून घेता येईल (फोटो सौजन्य – iStock)
शरीराला मिळेल एनर्जी
शरीराला चांगली एनर्जी मिळू शकते
अंजीरचा रस प्यायल्याने शरीर थंड होईल. अंजीरचा रस प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटेल. अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आढळते, म्हणून अंजीरचा रस प्यायल्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते आणि थकवा देखील दूर होतो. उन्हाळ्यात अंजीरचा रस पिणे हे एखाद्या टॉनिकपेक्षा कमी नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्येही अंजीराच्या रसाचा समावेश करून घेऊ शकता
हाडांसाठी फायदेशीर
अंजीरचा रस हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. अंजीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक आढळतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करू शकतात. एका ठराविक वयानंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागते आणि मग अशावेळी आपण नक्की कोणता आहार घ्यावा असा प्रश्न असेल तर तुम्ही अंजीर ज्युस नक्की पिऊ शकता.
एनिमियावर उपायकारक
एनिमियासाठी उत्तम
अंजीरमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, पोटॅशियम आणि लोह आढळते. उन्हाळ्यात अंजीरचा रस पिण्यामुळे शरीरातील रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होऊ शकते. जर तुम्हाला अशक्तपणा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा रस समाविष्ट करू शकता. एनिमियावर उत्तम उपाय म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता
रिसर्चनुसार, हृदयाच्या आरोग्यासह रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ‘सुके फळ’, नियमित खावे
अंजीरचे सरबत कसे बनवावे?
अंजीर सरबताची रेसिपी
अंजीरचे सरबत बनविणे सोपे आहे. तुम्ही घरीच हे तयार करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही 4-5 मोठे सुकलेले अंजीर, 1 चमचा गूळ, वेलची पावडर आणि पाण्याचा वापर करावा. कृती कशी करावी जाणून घ्या –
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.