Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट लहान मुलांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. परिसरातील रुग्णालयांमध्ये बालरुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. तज्ज्ञांनी पालकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 12:46 PM
हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • उष्णतेची लाट, प्रदूषण आणि अस्वच्छता यामुळे लहान मुलांमध्ये विविध तक्रारी वाढताना दिसत आहेत.
  • शासकीय आणि खासगी रुग्णालयांत दररोज मोठ्या संख्येने बालरुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
  • डॉक्टरांनी पालकांना योग्य आहार, स्वच्छता आणि दैनंदिन काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
वातावरणातील झपाट्याने होणारे बदल, वाढती उष्णता आणि अस्वच्छतेमुळे ठरण व पनवेल परिसरात लहान मुलांमध्ये उन्हाळी आजारांचे प्रमाण वाढले आहे. ताप, सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी तसेच अशा तक्रारींनी जुलाब-उलट्या बालरुग्णालये गजबजलेली दिसत आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असताना मुलांकडून थंड पेये, बर्फाचे गोळे आणि उघड्‌यावरचे खाद्यपदार्थ यांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पदार्थांमध्ये वापरले जाणारे अस्वच्छ पाणी आणि बर्फ हे आजारांना आमंत्रण देत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. परिणामी, व्हायरल इन्फेक्शन, पचनसंस्थेचे विकार आणि घशाचे त्रास वाढताना दिसत आहेत. औद्योगिकीकरण व प्रदूषणाचा परिणाम उरण व पनवेल परिसरात वाढते.

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून श्वसनविकार, अॅलर्जी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. काही गावांमध्ये साचलेली घाण आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे.

रुग्णालयांमध्ये बालरुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र

उरण आणि पनवेल तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत दररोज मोठ्या संख्येने लहान मुले उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांमध्ये जुलाब-उलट्या आणि तापाची लक्षणे अधिक प्रमाणात आढळत आहेत. निर्जलीकरणाचा धोका टाळण्यासाठी तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

डॉक्टरांचा सल्ला काय ?

डॉ. सत्या ठाकरे यांनी सांगितले की, “वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब यांचा त्रास होतो. उन्हाळ्यात मुलांना भरपूर पाणी पाजणे अत्यावश्यक आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेरच्या उष्ण वातावरणातून आल्यावर लगेच थंड पाणी किंवा थंड पदार्थ देऊ नयेत. स्वच्छता उघड्यावरचे अन्न टाळणे गरजेचे आहे.”

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण

पालकांनी घ्यायची काळजी

  • मुलांना उकळलेले किंवा शुद्ध पाणीच द्यावे
  • हात धुण्याची सवय लावावी
  • उघड्यावरचे व बर्फाचे पदार्थ टाळावेत
  • डासांपासून संरक्षणासाठी परिसर स्वच्छ ठेवावा
  • ताप, उलट्या-जुलाब वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Impact of climate change children suffer from fever diarrhea and vomiting lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Climate Change
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या
1

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
2

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक
3

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश
4

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.