Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Long Distance Relationship टिकवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स; नात्यातील प्रेम आणि विश्वास राहील कायम!

Long Distance Relationship: आजच्या काळात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जोडप्यांना एकमेकांपासून दूर राहावे लागते. अशा वेळी नात्यातील प्रेम टिकवणे आणि एकमेकांना वेळ देणे थोडे कठीण होऊ शकते.ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो.नातं घट्ट राहावं असा प्रत्येकालाच वाटत असता त्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील हे

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 05:47 PM
Follow these special tips to sustain a long-distance relationship(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow these special tips to sustain a long-distance relationship(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Long Distance Relationship Tips: आजच्या काळात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जोडप्यांना एकमेकांपासून दूर राहावे लागते. अशा वेळी नात्यातील प्रेम टिकवणे आणि एकमेकांना वेळ देणे थोडे कठीण होऊ शकते.ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो.नातं घट्ट राहावं असा प्रत्येकालाच वाटत असता त्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील हे मात्र सजत नाही. एकमेकांची भेट होत नसल्याने कधी गैरसमज, तर कधी एकटेपणाची भावना निर्माण होते. मात्र, योग्य संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर Long Distance Relationship देखील आनंदी आणि मजबूत राहू शकते. जाणून घेऊया अशा काही खास टिप्स, ज्या तुमचे नाते अधिक घट्ट करण्यास मदत करतील.(Long Distance Relationship)

१. एकमेकांशी नियमित संवाद साधा

कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो.त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलला नाहीत तर गैरसमज वाढू लागतात. जर तुमचे जोडीदार अबोल असतील तर तुम्हाला संवादाची सुरुवात करावी लागेल त्याशिवाय गैरसमज दूर नाही होणार , दिवसभरात कितीही व्यस्त असलात तरी जोडीदाराशी बोलण्यासाठी थोडा वेळ काढा. फोन कॉल, व्हिडिओ कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून एकमेकांची विचारपूस करा. दिवसभरात घडलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर केल्याने भावनिक जवळीक टिकून राहते.

 Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय

२. एकमेकांवर विश्वास ठेवा.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. जोडीदार कुठे आहे, कोणासोबत आहे, याबाबत सतत संशय घेणे टाळा.संशयित स्वभावामुळे तुमचे जोडीदार दुरावले जाऊ शकतात. त्यांच्या बरोबर तुमचे जे काही विचारे असतील ते स्पष्ट करा विनाकारण प्रश्न विचारल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या आणि विश्वास कायम ठेवा.

३. एकमेकांसाठी वेळ काढा.

काम किंवा शिक्षणामुळे कितीही व्यस्त असलात तरी जोडीदारासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. दोघांच्या सोयीनुसार बोलण्याची वेळ ठरवा. एकत्र ऑनलाइन चित्रपट पाहणे, गेम खेळणे किंवा व्हिडिओ कॉलवर गप्पा मारणे अशा छोट्या गोष्टींमुळे नात्यात आनंद टिकून राहतो.यामुळेनात्याची जवळीकता वाढते. आणि नटे अधिकच घट्ट होत जाते. दिवसभरातील गोष्टींबद्दल गप्पा मारा.

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

४. छोट्या गोष्टींमधून प्रेम व्यक्त करा.

प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. एखादा प्रेमळ मेसेज, अचानक केलेला फोन, वाढदिवसाला पाठवलेली भेट किंवा खास दिवसाची आठवण ठेवणे यामुळे जोडीदाराला आपले महत्त्व जाणवते.तुम्ही केलेल्या एका मेसेज मुळे देखील खुश होतील

५. गैरसमज वेळीच दूर करा.

नात्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र, रागाच्या भरात चुकीचे बोलणे किंवा अनेक दिवस संवाद बंद ठेवणे टाळा. काही गैरसमज निर्माण झाल्यास शांतपणे चर्चा करा आणि एकमेकांची बाजू समजून घ्या.नात्यानं मध्ये दुरावा आला असल्यास संवाद साधण्याचा प्रयत्न करा. रागाच्याभरात चुकीच्या गोष्टी करून ना . जोडीदाराला राग आल्यास त्याचा राग शांत होण्यासाठी वेळ द्या.

६. भेटण्याचे नियोजन करा

शक्य असेल तेव्हा एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करा. भेटीचे नियोजन केल्याने दोघांनाही आनंद मिळतो आणि नात्यातील उत्साह कायम राहतो.तसेच भेटल्यामुळे नात्यांमध्ये आनंद वाढतो. जास्तीत जास्त भेटण्याचा करणे महत्वाचे आहे.

थोडक्यात सांगायचे तर, Long Distance Relationship टिकवण्यासाठी केवळ प्रेम असून चालत नाही, तर विश्वास, संवाद, संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारीही आवश्यक असते. अंतर कितीही असले तरी मनाने जवळ राहिल्यास नाते नक्कीच अधिक मजबूत होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये नाते मजबूत कसे ठेवावे?

    Ans: नियमित संवाद साधणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे, जोडीदारासाठी वेळ काढणे आणि प्रेम व्यक्त करणे यामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मजबूत ठेवण्यास मदत होते.

  • Que: लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये गैरसमज कसे दूर करावेत?

    Ans: गैरसमज निर्माण झाल्यास जोडीदाराशी शांतपणे चर्चा करा. एकमेकांचे म्हणणे समजून घ्या आणि रागाच्या भरात चुकीचे बोलणे किंवा संवाद बंद ठेवणे टाळा.

  • Que: लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये जोडीदारासाठी वेळ कसा काढावा?

    Ans: दोघांच्या सोयीनुसार फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलची वेळ ठरवा. एकत्र ऑनलाइन चित्रपट पाहणे, गेम खेळणे आणि दिवसभरातील अनुभव शेअर करणे यांसारख्या गोष्टींमुळे नात्यातील जवळीक टिकून राहते.

Web Title: Follow these special tips to sustain a long distance relationship sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Love Relationship tips
  • relationship
  • relationship advice

संबंधित बातम्या

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग
1

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा
2

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.