Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

health news: गुडघ्याच्या सांधे शस्त्रक्रियेनंतर व उपचारानंतर ५६ वर्षीय महिला आधाराशिवाय चालू लागली

health news: मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ५६ वर्षीय महिलेवर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुडघ्याचा सांधेबदल आणि फ्रॅक्चरवरील उपचार यशस्वीरीत्या करण्यात आले. ऑस्टिओआर्थरायटिस, हाडांची विकृती आणि फ्रॅक्चर अशा गुंतागुंतीच्या समस्यांवर एकाच शस्त्रक्रियेत उपचार करण्यात आले.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 20, 2026 | 02:21 PM
Following knee joint surgery and subsequent treatment( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )

Following knee joint surgery and subsequent treatment( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न अर्धवट सोडावा लागला.
  • वैद्यकीय चाचण्यांमधून उजव्या गुडघ्यात ऑस्टिओआर्थरायटिस (सांध्यांची झीज होऊन होणारा संधिवात)
  • हाडांच्या विकृतीमुळे लांब इम्प्लांट स्टेम बसवणे हे मोठे आव्हान, समस्येवर मात करून ऑफसेट स्टेमचा वापर करण्यात आला.
फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न अर्धवट सोडावा लागल्यामुळे उजव्या पायात विकृती निर्माण झालेल्या ५६ वर्षीय महिलेवर मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये संयुक्त शस्त्रक्रिया करण्यात आली होती.शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांमध्ये महिला वेदनांशिवाय चालू लागली असून, तिच्या गुडघ्याची हालचाल पूर्णपणे पूर्ववत झाली होती आणि पायातील विकृतीही दूर करण्यात यश आले आहे.  माहितीनुसार, यापूर्वी पाटणा येथील एका रुग्णालयात गुडघ्याजवळील नडगीच्या हाडाचा (प्रॉक्सिमल टिबिया) फ्रॅक्चर झाल्यानंतर शस्त्रक्रिया. मात्र, ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि ती अर्धवट सोडावी लागली.(health news)

वैद्यकीय तपासणी आणि चाचण्यामधून निदान, मेको रोबोटिक सिस्टीमच्या सहाय्याने टोटल नी रिप्लेसमेंट

सविस्तर वैद्यकीय तपासणी आणि इमेजिंग चाचण्यांमधून उजव्या गुडघ्यात ऑस्टिओआर्थरायटिस (सांध्यांची झीज होऊन होणारा संधिवात) तसेच टिबियाच्या वरच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. सांध्यांची झीज, फ्रॅक्चर आणि आधीपासून असलेली हाडांची विकृती यामुळे ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या ही सर्जरी गुंतागुंतीची ठरली. फ्रॅक्चर आणि हाडांच्या बदललेल्या रचनेमुळे शल्यचिकित्सकांसमोर दुहेरी आव्हान होते.

एकीकडे गुडघ्याच्या संधिवातावर उपचार करणे, तर दुसरीकडे टिबियामध्ये बसवण्यात येणाऱ्या इम्प्लांटची योग्य स्थिती आणि स्थिरता सुनिश्चित करणे आवश्यक होते. यापूर्वी झालेल्या अर्धवट शस्त्रक्रियेचाही उपचाराचे नियोजन करताना विचार करावा लागला.शस्त्रक्रिया पथकाने स्ट्रायकर मेको रोबोटिक सिस्टीमच्या सहाय्याने टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघ्याचा संपूर्ण सांधेबदल) करण्याचा निर्णय घेतला. फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी टिबियाच्या बाजूला लांब स्टेम बसवण्याची प्रक्रियाही या शस्त्रक्रियेत करण्यात आली.

खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

डॉक्टरांची एकूण भूमिका काय होती?

डॉ. गझनफर पटेल, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक्स, मिनिमली इन्व्हेसिव्ह / रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ यांनी सांगितले की, टिबियाच्या वरच्या भागातील हाडांच्या विकृतीमुळे लांब इम्प्लांट स्टेम बसवणे हे मोठे आव्हान होते. या समस्येवर मात करण्यासाठी ऑफसेट स्टेमचा वापर करण्यात आला.

या विशेष प्रकारच्या इम्प्लांटमुळे हाडाच्या आतील पोकळ भागात स्टेम योग्य पद्धतीने बसवता येतो आणि त्याच वेळी गुडघ्याच्या सांधेबदलासाठी वापरण्यात येणारा मुख्य घटक योग्य स्थितीत ठेवता येतो. या तंत्रामुळे फ्रॅक्चरमुळे निर्माण झालेली विकृती दूर करण्यासोबतच गुडघ्याच्या सांधेबदलाचे योग्य अलाइनमेंट राखणे शक्य झाले.

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

सांध्यांच्या शास्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घेतली गेली ?

अशा प्रकारे एकाच इम्प्लांटच्या साहाय्याने एकाच शस्त्रक्रियेत ऑस्टिओआर्थरायटिस आणि टिबियाच्या वरच्या भागातील फ्रॅक्चर या दोन्ही समस्यांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे या दोन समस्यांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता टळली.शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी रुग्णाला चालण्यासाठी उभे करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतरच्या १२व्या दिवशी ती कोणत्याही आधाराशिवाय चालू लागली.शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी करण्यात आलेल्या फॉलोअप तपासणीत तिच्या गुडघ्याची हालचाल पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले.

ती कोणत्याही वेदनेशिवाय चालण्यास सक्षम झाली होती.तसेच उजव्या पायातील विकृतीही दूर करण्यात आली होती. या प्रकरणातून सांध्यांचा संधिवात, फ्रॅक्चर आणि हाडांची विकृती या समस्या एकत्रितपणे उद्भवल्यास प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार स्वतंत्र शस्त्रक्रिया नियोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. अशा परिस्थितीत उपचार करताना केवळ खराब झालेल्या सांध्यावर लक्ष केंद्रित न करता, आजूबाजूच्या हाडांची संरचनात्मक स्थिरता राखणेही तितकेच महत्त्वाचे असते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?

    Ans: ऑस्टिओआर्थरायटिस हा सांध्यांमधील कूर्चाची झीज झाल्यामुळे उद्भवणारा संधिवाताचा एक प्रकार आहे. यामुळे सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा आणि हालचाल करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.

  • Que: रोबोटिक गुडघा सांधेबदल शस्त्रक्रिया म्हणजे काय?

    Ans: रोबोटिक गुडघा सांधेबदल शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना सांध्याचे नियोजन आणि इम्प्लांटची योग्य स्थिती निश्चित करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाची मदत मिळते. शस्त्रक्रिया डॉक्टरच करतात.

  • Que: टिबियाचे फ्रॅक्चर म्हणजे काय?

    Ans: टिबिया म्हणजे पायाच्या खालच्या भागातील नडगीचे मोठे हाड. या हाडाच्या वरच्या भागाला, म्हणजे गुडघ्याजवळील भागाला फ्रॅक्चर झाल्यास उभे राहणे, चालणे आणि गुडघा हलवणे यामध्ये अडचणी येऊ शकतात.

Web Title: Following knee joint surgery and subsequent treatmentsb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • ahealth news
  • Mumbai hospital
  • Surgery

संबंधित बातम्या

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता
1

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स
2

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.