Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढऱ्या मिठापेक्षा हिरवे मीठ चवीला अधिक स्वादिष्ट! आंब्यावर टाकताच तोंडाला पाणी सुटेल; सारांश गोइलाने शेअर केली रेसिपी

Green Salt Recipe: अनेक चविष्ट गोष्टी ॲड करून सध्या पांढऱ्या मिठाला हिरवे मीठ करता येते. हे मीठ चवीला फार अप्रतिम लागते. शेफ सारांश गोइलाने आपल्या इंट्सग्राम अकाऊंटवर याची भन्नाट रेसिपी शेअर केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 26, 2025 | 08:15 PM
पांढऱ्या मिठापेक्षा हिरवे मीठ चवीला अधिक स्वादिष्ट! आंब्यावर टाकताच तोंडाला पाणी सुटेल; सारांश गोइलाने शेअर केली रेसिपी

पांढऱ्या मिठापेक्षा हिरवे मीठ चवीला अधिक स्वादिष्ट! आंब्यावर टाकताच तोंडाला पाणी सुटेल; सारांश गोइलाने शेअर केली रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्याही पदार्थाला चव ही मिठाने येत असते. मिठाशिवाय पदार्थ स्वादिष्ट बनत नाही. आता पांढऱ्या रंगांचे मीठ हे तुम्ही नक्कीच चाखले असेल. बहुतेक घरात या मिठाचा वापर केला जातो. पिंक सॉल्ट म्हणजेच गुलाबी रंगाच्या मिठाचाही अनेकजण वापर करतात मात्र तुम्ही कधी हिरवे मीठ चाखून पाहिले आहे का? होय, हे खरे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेफ सारांश गोइलाने याची एक चविष्ट रेसिपी शेअर केली आहे. याची चव पांढऱ्या मिठाहून फार वेगळी आणि अधिक रुचकर आहे. हे हिरवे मीठ तुम्ही सॅलड, कैरी, कोशिंबीर यावर टाकून याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग या हिरव्या मिठाची चविष्ट रेसिपी जाणून घेऊया.

Gudi Padwa 2025: सणानिमित्त करा खास बेत, घरच्या घरी बनवा गोड थंडगार आम्रखंड; फार सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • ½ कप हिरवे लसूण किंवा पाकळ्या
  • 1/4 कप ताजी कोथिंबीर
  • 2 हिरव्या मिरच्या
  • एक टेबलस्पून जिरे
  • 2 चमचे मीठ

घरी कसे बनवायचे हिरवे मीठ?

  • घरीच हिरवे मीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हिरव्या लसणाची पात कापून घ्या
  • यानंतर ही कापलेली पात मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मग यात ताजी कोथिंबीर चिरून टाका
  • यानंतर यात आल्याचे बारीक तुकडे, मिरचीचे तुकडे आणि नेहमीचे आपले सामान्य मीठ ॲड करा
  • आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, यामुळे पेस्ट तयार होईल
  • आता त्यात पुन्हा थोडे मीठ घाला आणि व्यवस्थित पेस्टमध्ये हे मीठ मिक्स करा
  • हिरव्या मिठाची पेस्ट तयार झाल्यानंतर, ही पेस्ट ओव्हनमध्ये बेक करा अथवा उन्हात काही तास वाळवत ठेवा
  • आता सुकलेल्या या पेस्टला खलबत्त्यात वाटून याची पावडर तयार करा
  • अशाप्रकारे तुमचे हिरवे चविष्ट मीठ घरीच तयार होईल
  • तुम्ही अनेक महिने या मिठाला एका डब्यात भरून साठवून ठेवू शकता

Raw Mango Chutney: कैरीपासून बनवा आंबट-गोड चटणी; जेवणाची चव आणखीन वाढेल

हिरव्या मिठाचे फायदे

  • भूक वाढवण्यास मदत होते
  • पचनशक्ती सुधारते
  • जेवणाची चव आणखीन वाढते
  • कोशिंबीर, काकडी, दही, ताक, रायला अशा पदार्थांना अप्रतिम चव देते
  • याचा मधुर सुंगंध पदार्थाची चव द्विगुणित करतो आणि याकडे आकर्षित करतो

Web Title: Green salt is tastier than white salt perfect for mangoes recipe shared by saransh goila lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
4

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.