Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यासाठी काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी खायचे असेल तर झटपट बनवा मुरमुऱ्याचे अप्पे

Breakfast Recipe: दक्षिण भारतीय पदार्थ त्यांच्या अनोख्या चवीमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला मुरमुऱ्यांपासून चविष्ट असे अप्पे कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2024 | 10:53 AM
नाश्त्यासाठी काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी खायचे असेल तर झटपट बनवा मुरमुऱ्याचे अप्पे

नाश्त्यासाठी काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी खायचे असेल तर झटपट बनवा मुरमुऱ्याचे अप्पे

Follow Us
Follow Us:

अप्पे हा एक दक्षिण भारतीय पारंपारिक पदार्थ आहे, जो बनवायला खूप सोपा आहे आणि खाण्यास तितकाच चविष्ट आह. प्रत्येकजण हा पदार्थ मोठ्या आवडीने खातो. याशिवाय त्यात तेल आणि मसाल्यांचा फारसा वापर नसल्यामुळे ते पौष्टिकही असते. अप्पे तयार करण्यासाठी फार वेळ आणि मेहनतीची गरज पडत नाही. जर तुम्हाला चव थोडी बदलायची असेल तर तुम्ही यात मुरमुरे मिक्स करून एका वेगळ्या चवीचा अनुभव घेऊ शकता. हा पदार्थ बनवायला जितका सोपा आहे तितकाच तो पौष्टिकही आहे.

एकूणच, अनेक फायद्यांसह, ॲपे एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे . परंतु, सामान्यतः अप्पे हे रव्यापासून अथवा तांदळाच्या पिठापासून घरी बनवले जाते. ते मऊ, सॉफ्ट आणि स्वादिष्ट असतात. मात्र याला ट्विस्ट द्यायचा असेल, तर तुम्ही यात मुरमुरे देखील घालू शकता. मुरमुरे टाकून तयार केलेले हे अप्पे चवीला अप्रतिम लागतात आणि आरोग्यासाठीही तितकेच फायद्याचे ठरतात. चला तर मग अजिबात वेळ न घालवत लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

थंडीत बनवा काबुली चण्याचे कबाब, काही मिनिटांतच तयार होते सोपी रेसिपी

साहित्य

  • मुरमुरे 1 कप
  • रवा 1 कप
  • दही 2 चमचे
  • चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट
  • ताजी काळी मिरी
  • मसाला
  • मीठ
  • किसलेले गाजर
  • बारीक चिरलेला कांदा
  • सिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • हिरवे धणे
  • कढीपत्ता
  • तिखट लाल मिरची
  • तेल
कच्च्या हळदीची भाजी कधी खाल्ली आहे का? जाणून घ्या कसा बनवायचा हा राजस्थानी पदार्थ

कृती

  • सर्व प्रथम, मुरमुऱ्यांना पाण्यात भिजवून घ्या आणि रव्यामध्ये दही आणि पाणी मिसळा आणि फेटून घ्या
  • कुरमुरे दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर रव्याच्या मिश्रणासह मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या
  • आता हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात मीठ, लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला
  • नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिरवी धणे, कांदा, सिमला मिरची आणि गाजर घाला आणि मिक्स करा
  • यानंतर, अप्पे तयार करण्याच्या साच्यात थोडे तेल पसरवून घ्या आणि साचा गॅसवर ठेवून द्या
  • आता साच्यात चमच्याने तयार केलेले अप्पे मिश्रण घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या
  • काही मिनिटांनी अप्पे पलटून, त्यांना दुसऱ्या बाजूनेही छान शिजवून घ्या
  • यानंतर कढईत मोहरीचे तेल टाकून त्यात कढीपत्ता आणि मोहरी घाला
  • यानंतर यात मुरमुरे अप्पे घाला आणि थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या
  • चविष्ट आणि हेल्दी अप्पे तयार आहेत, यांना नारळाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make murmure appe recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:53 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
2

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी
3

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
4

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.