Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

Egg Chop Recipe : ही एग चॉप रेसिपी घरच्या घरी सहज बनवता येते आणि चवीला अतिशय खमंग लागते. योग्य मसाले आणि कुरकुरीत कोटिंगमुळे हा पदार्थ नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 03:30 PM
बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार... तुम्ही कधी 'एग चॉप' खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार... तुम्ही कधी 'एग चॉप' खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • एग चॉप ही एक बंगाली डिश आहे.
  • ही एक नाश्ता रेसिपी आहे.
  • काहीतरी नवीन ट्राय करायचं असल्यास तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.
भारतीय स्वयंपाकात अंड्यापासून बनणाऱ्या पदार्थांची विविधता खूप मोठी आहे. उकडलेले अंडे, आमलेट, भुर्जी किंवा करी यांसारखे पारंपरिक प्रकार आपण नेहमीच खातो; पण थोडे वेगळे, स्ट्रीट फूडसारखे काही बनवायचे असल्यास एग चॉप हा उत्कृष्ट पर्याय ठरतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, मसालेदार बटाट्याच्या थरात गुंडाळलेले उकडलेले अंडे… असा या पदार्थाचा आकर्षक पोत आणि स्वाद असतो.

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

संध्याकाळच्या चहासोबत, वाढदिवसाच्या पार्टीत, छोट्या गेट-टुगेदरमध्ये किंवा मुलांच्या डब्यासाठीही एग चॉप उत्तम लागतो. विशेष म्हणजे हा पदार्थ घरातील सहज उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. बटाट्याचा मसाला योग्य प्रमाणात मसालेदार ठेवला तर चव अधिक खुलते. तळल्यानंतर तयार होणारा सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणा पाहूनच खाण्याची इच्छा होते. चला तर मग, सविस्तर पद्धतीने एग चॉप कसा बनवायचा यासाठीची एक सोपी रेसिपी नोट करुन घेऊयात.

साहित्य:

  • 4 उकडलेली अंडी
  • 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1–2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • 2 टेबलस्पून मैदा
  • ब्रेडक्रम्स आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • तळण्यासाठी तेल
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

कृती:

  • सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात चांगले मॅश करा. त्यात कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा.
  • उकडलेली अंडी सोलून घ्या. इच्छेनुसार अंडी पूर्ण ठेवू शकता किंवा दोन समभाग करा. हलकेसे मीठ आणि तिखट शिंपडून बाजूला ठेवा.
  • बटाट्याच्या मिश्रणाचा एक भाग हातावर घ्या. त्याच्या मधोमध अंडे ठेवून सर्व बाजूंनी बटाट्याचे मिश्रण लावून अंडे पूर्णपणे झाका. अंडाकृती किंवा गोल आकार द्या.
  • मैदा आणि थोडे पाणी घालून पातळ घोळ तयार करा. तयार केलेला चॉप प्रथम मैद्याच्या घोळात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्समध्ये व्यवस्थित घोळवा, जेणेकरून सर्व बाजूंनी समान कोटिंग होईल.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम तापमानाला आल्यावर तयार चॉप हलक्या हाताने तेलात सोडा. मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले एग चॉप टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम एग चॉप हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

Web Title: Know how to make egg chop at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • egg recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल
1

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
2

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट
3

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी
4

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.