Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

Arabian Pudding Recipe : दिसायला आकर्षित आणि चवीला मजेदार लागणारी अरेबियन पुडिंग क्षणात मेजवाणीची रंगत वाढवते. ही पुडिंग तोंडात जाताच विरघळते ज्यामुळे ती खायला आणखीनच चांगली लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 10:09 AM
Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी 'अरेबियन पुडिंग', पाहूनच तोंडात येईल पाणी

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी 'अरेबियन पुडिंग', पाहूनच तोंडात येईल पाणी

Follow Us
Follow Us:
  • अरेबियन पुडिंग ही एक अतिशय चविष्ट, क्रीमी आणि थंडगार मिठाई आहे.
  • मऊ, गोड आणि सुगंधित चवीने भरलेली ही डिश मेजवाणीची रंगत वाढवते.
  • रमजानला सुरुवात झाली असून इफ्तारच्या मेजवाणीत तुम्ही या डिशचा समावेश करु शकता.
मिडल ईस्ट देशांमध्ये लोकप्रिय असलेले अरेबियन पुडिंग हे एक अतिशय मऊ, क्रीमी आणि सुगंधी डेझर्ट आहे. विशेषतः रमजान, ईद किंवा खास पाहुणचारासाठी हे पुडिंग आवर्जून बनवले जाते. खजूर, ड्रायफ्रूट्स, दूध आणि कस्टर्ड पावडर यांचा सुंदर मिलाफ या पदार्थाला वेगळीच चव आणि टेक्स्चर देतो. या पुडिंगची खासियत म्हणजे यामध्ये गोडवा नैसर्गिक खजुरांमधून येतो आणि वरून घातलेले बदाम-पिस्ता त्याला रॉयल लूक देतात.

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

ही पुडींग थंडगार सर्व्ह केल्यावर याची चव अजूनच खुलते. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीत तयार होणारे हे डेझर्ट घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे बनवता येते. कोणत्या खास प्रसंगी पाहुण्यांना खुश करण्यासाठी तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करु शकता. चला तर मग पाहूया स्वादिष्ट अरेबियन पुडिंग बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • १ लिटर दूध
  • १/२ कप साखर
  • ३ टेबलस्पून कस्टर्ड पावडर (व्हॅनिला फ्लेवर)
  • ८-१० बिया काढलेले खजूर (बारीक चिरलेले)
  • २ टेबलस्पून बदाम काप
  • २ टेबलस्पून पिस्ता काप
  • १/२ टीस्पून वेलची पूड
  • २ टेबलस्पून ताजी साय किंवा फ्रेश क्रीम
लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

कृती:

  • एका भांड्यात दूध गरम करण्यास ठेवा. दूध हलवत उकळी येऊ द्या.
  • एका छोट्या वाटीत थोड्या थंड दुधात कस्टर्ड पावडर गाठी न राहता नीट मिसळून घ्या.
  • उकळत्या दुधात साखर घाला आणि ढवळा. त्यानंतर तयार कस्टर्ड मिश्रण हळूहळू घालत सतत ढवळत राहा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात चिरलेले खजूर आणि वेलची पूड घाला.
  • आता त्यात फ्रेश क्रीम घालून २-३ मिनिटे शिजवा, जेणेकरून पुडिंग अधिक क्रीमी होईल.
  • गॅस बंद करून मिश्रण सर्व्हिंग बाऊलमध्ये ओता. वरून बदाम आणि पिस्ता काप पसरवा.
  • हे पुडिंग पूर्ण थंड होऊ द्या आणि किमान २ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • थंडगार अरेबियन पुडिंग वरून थोडे मध किंवा केशर घालून सर्व्ह केल्यास चव अजूनच छान लागते.
  • आता तुमचे रॉयल स्टाईल अरेबियन पुडिंग सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
 

 

Web Title: Ramdan 2026 make tasty sweet and delicious arabian pudding at home for iftar recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
1

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
2

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
3

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी
4

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.