Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात पहिले ऑम्लेट कोणी तयार केले? कुणाला सुचली पदार्थाची कल्पना… रंजक इतिहास जाणून घ्या

Omlet History: ऑम्लेट हा पदार्थ तुम्ही कधी ना कधी नक्कीच खाल्ला असेल, अनेकांच्या नाश्त्यातील हा एक अविभाज्य भाग आहे. अशात या चवदार पदार्थाचा शोध प्रथम कुणी लावला हे तुम्हाला माहिती आहे का?

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 25, 2025 | 11:29 AM
सर्वात पहिले ऑम्लेट कोणी तयार केले? कुणाला सुचली पदार्थाची कल्पना... रंजक इतिहास जाणून घ्या

सर्वात पहिले ऑम्लेट कोणी तयार केले? कुणाला सुचली पदार्थाची कल्पना... रंजक इतिहास जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

ऑम्लेट, हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांनाच खायला फार आवडतो. झटपट तयार होणारा हा पदार्थ अनेकांच्या नाश्त्याच्या एक अविभाज्य भाग आहे.जगभरातील लोक फार आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतात. पटकन भूक भागवण्यासाठी काहीतरी खायचे असेल किंवा सहज चवदार पदार्थ खायचे असतील तर ऑम्लेट हा उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ऑम्लेट बनवण्याची कल्पना सर्वप्रथम कोणाच्या मनात आली? आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑम्लेट पदार्थाचाही एक फार मनोरंजक इतिहास आहे जो आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

ऑम्लेट हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच कूकबुक ‘क्युझिन बुर्जुआ’मध्ये याची प्रथम नोंद झाली. तथापि, तत्सम शब्द ‘अलुमेट’ 14 व्या शतकापासून वापरात होता. पण ही फक्त नावाची बाब आहे, हे देखील शक्य आहे की ही डिश फ्रान्सच्या आधीही कुठेतरी अस्तित्वात असावी. कारण त्याच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास हे लक्षात येते की ही डिश कोणत्याही एका ठिकाणाची किंवा काळाची निर्मिती नाही, तर ती वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात विकसित झाला आहे.

जगातील जवळजवळ प्रत्येक संस्कृतीने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ऑम्लेट बनवले आहे. प्राचीन रोमन लोक अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ मिसळून ऑम्लेट बनवत असत. त्याच वेळी, इराण आणि जपानमध्ये, ऑम्लेटसारखे पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले गेले. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींनी गरम तव्यावर अंडी फेटून भाजी किंवा मसाले घालून ऑम्लेट बनवायला सुरुवात केली. तथापि, आता ते जगभर बनवले जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवले आणि खाल्ले जाते.

ऑम्लेटची प्रसिद्ध कथा

ऑम्लेटच्या इतिहासातील एक प्रसिद्ध कथा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, नेपोलियन आणि त्याचे सैन्य एका लहान गावातून जात होते, जेथे स्थानिक हॉटेल मालकाने त्यांना ऑम्लेट दिले. नेपोलियनला त्याची चव इतकी आवडली की त्याने दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातून अंडी गोळा करून सैन्यासाठी एक मोठा ऑम्लेट बनवण्याचा आदेश दिला. ही कथा खरी असो वा नसो, पण यानंतर फ्रान्समधील बेसिरेस शहरात दरवर्षी एक मोठा ऑम्लेट उत्सव साजरा केला जाऊ लागला, यामध्ये शेकडो अंड्यांपासून बनवलेले ऑम्लेट संपूर्ण शहरातील लोकांना दिले जाते.

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

ऑम्लेटचा शोध कोणी लावला?

असे दिसते की ऑम्लेटचा शोध कोणा एका व्यक्तीने किंवा ठिकाणाने लावला नसून, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ विकसित होत गेला. कोणत्याही डिशची मुळे शोधणे सोपे नाही, परंतु असे नक्कीच म्हणता येईल की ही डिश जगातील प्रत्येक भागात आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. इतक्या वर्षांनंतरही याची लोकप्रियता अजूनही काही कमी झाली नाही.

Web Title: Who made the first omelette who came up with the idea know the interesting history in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • food history
  • new information

संबंधित बातम्या

ती एक घटना अन् संपूर्ण शहर झालं उद्ध्वस्त! मानवच काय तर प्राणीही राहिले नाही; रक्त उकळलं, कवट्या फुटल्या….
1

ती एक घटना अन् संपूर्ण शहर झालं उद्ध्वस्त! मानवच काय तर प्राणीही राहिले नाही; रक्त उकळलं, कवट्या फुटल्या….

Blind Restaurant: डोळ्यावर पट्टी आणि बरंच काही; इथे जेवण पाहायला मिळत नाही तर संवेदनांनी पदार्थ ओळखायचा असतो
2

Blind Restaurant: डोळ्यावर पट्टी आणि बरंच काही; इथे जेवण पाहायला मिळत नाही तर संवेदनांनी पदार्थ ओळखायचा असतो

गांधीजींचा चष्मा कितीला विकला गेला? किंमत ऐकाल तर चक्रावून जाल
3

गांधीजींचा चष्मा कितीला विकला गेला? किंमत ऐकाल तर चक्रावून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.