Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Special: पारंपारिक पद्धतीने घरी बनवा कुरकुरीत अन् चविष्ट कोथिंबीर वडी

Kothimbir Vadi Recipe: हिवाळ्यात एकदा तरी घरी महाराष्ट्रीयन स्पेशल कोथिंबीर वडीचा बेत नक्की आखा. पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वडी घरी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2024 | 10:54 AM
Winter Special: पारंपारिक पद्धतीने घरी बनवा कुरकुरीत अन् चविष्ट कोथिंबीर वडी

Winter Special: पारंपारिक पद्धतीने घरी बनवा कुरकुरीत अन् चविष्ट कोथिंबीर वडी

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधील एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी! कोथिंबीर वडी लहानांचीच नाही तर मोठ्यांचीही फेव्हरेट आहे. सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत भरपूर भाजीपाला स्वस्त दरात बाजारात विक्रीसाठी येत असतो. अशात तुम्ही या ऋतूत रात्रीच्या जेवणात कोथिंबीर वडीचा बेत आखू शकता. कोथिंबीर, मसाले आणि बेसनाचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो. मुख्य म्हणजे, याला बनवणे फार सोपे आहे. तुम्ही अगदी काही कमी वेळेत आणि काही निवडक साहित्यांचा वापर करून हा पदार्थ तयार करू शकता.

अनेक लोकांना पारंपारिक पद्धतीने घरी कोथिंबीर वडी कशी तयार करायची ते माहित नसते. बऱ्याचदा घरी तयार केलेल्या कोथिंबीर वडीची चव हवी तशी येत नाही. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरेल. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने परफेक्ट कोथिंबीर वडी तयार करू शकता. कोथिंबीरमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हिवाळ्याच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम कोबीचा पराठा, पौष्टिक अन् स्वादिष्ट रेसिपी!

साहित्य

  • एक कोथिंबीरची जुडी
  • एक ग्लास चण्याचे पीठ
  • दोन चमचे तिखट मसाला
  • धने-जिरे पावडर
  • एक चमचा मीठ (चवीनुसार)
  • हळद, सुके खोबरे, तेल, पाणी
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • आले लसूण पेस्ट (पाच ते सहा पाकळ्या लसूण)
चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी

कृती

  • कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर स्वछ धुवून घ्या
  • आता एक परात घ्या आणि यात चण्याचे पीठ, तेल, गरम मसाला, धने-जिरे पावडर, हळद, तिखट मसाला, मीठ आणि खुशखुशीत होण्यासाठी सुके खोबरे घाला
  • यानंतर यात कोथिंबीर चिरून घाला
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा
  • साहित्य एकजीव करत असताना आवश्यक असल्यास पाण्याचा वापर करा
  • शक्यतो अर्धी वाटी पाणी पुरेस असेल
  • आता तयार पिठाचा एक लांब गोळा तयार करा
  • इडलीच्या भांड्यात किंवा मोदकाच्या भांड्यात हा गोळा 20 मिनिटे छान वाफवून घ्या
  • वाफवून घेतल्यानंतर याला थंड करा
  • गोळा थंड झाला की चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या पाडा
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल चांगले तापले की, यात तयार कोथिंबीर वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • तळताना गॅसची फ्लेमही मध्यम असूद्यात
  • तुम्ही पॅनवरही कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करू शकता

Web Title: Winter special how to make perfect kothimbir vadi at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • kothimbir vadi
  • marathi recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.