सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी बहुतेकदा गरम पदार्थ खाल्ले जातात. थंडीत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पराठ्याचा आवर्जून समावेश होतो. या ऋतूत भाज्या फार स्वस्त होतात, ज्यामुळे लोक या ऋतूत वेगवगेळ्या गोष्टींचा पराठा बनवून त्याचा आस्वाद घेत असतात. पराठा हा एक पौष्टिक पण तितकाच चविष्ट असा पदार्थ आहे. देशात जवळजवळ सर्वच ठिकाणी हा पदार्थ बनवून खाल्ला जातो. आज मात्र आम्ही तुमच्यासोबत कोबीच्या पराठ्याची एक भन्नाट रेसिपी शेअर करत आहोत.
तुम्हाला कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून चविष्ट असा पराठा तयार करू शकता. हा पराठा फार कमी वेळेत आणि निवडक साहित्यापासून तयार केला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कोबीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते. ही एक कमी चरबीयुक्त भाजी आहे, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. चला तर मग कोबी पराठ्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी
साहित्य
Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश
कृती