नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. पण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन आणि गॅस होण्याची शक्यता असते. पोटामध्ये गॅस किंवा ऍसिडिटी झाल्यानंतर पोट सतत जड जड वाटू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. नाश्त्याच्या वेळेमध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तेलकट किंवा चवीला तिखट असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. असे केल्यामुळे पोटावर वाईट परिणाम दिसून येतात.
खाण्यापिण्यामध्ये बदल झाल्यानंतर सगळ्यांचं पोटदुखीची समस्या जाणवते. पोट दुखी सुरु झाल्यानंतर अनेक लोक इनो किंवा सोडा वैगरे पितात. पण यामुळे काही काळापुरती ऍसिडिटी कमी होते. त्यानंतर पुन्हा एकदा ऍसिडिटीचा त्रास सुरु होतो. सामान्यपणे ऍसिडिटीचा त्रास सगळ्यांचं होतो. जेवलेले अन्नपदार्थ पचण्यासाठी वेळ लागल्यानंतर पोटात गॅस निर्माण होतो. पोटात झालेल्या गॅसचे रूपांतर ऍसिडिटीमध्ये होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटीपासून वाचण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी काय खावे?
नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आरोग्यासाठी हानिकारक आहे. सतत चहा किंवा कॉफी पित राहिल्यामुळे पोटामध्ये ऍसिडिटी वाढू लागते. वाढत्या ऍसिडिटीपासून आराम मिळवायचा असेल तर सतत चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. पोटात ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे पोटात जळजळ होण्यास सुरुवात होते.
नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन
अनेकदा नाश्त्यामध्ये कोबीचा पराठा किंवा फुलगोबीची भाजी बनवली जाते. पण सकाळ सकाळ कोबी खाल्ल्यामुळे पोटात ऍसिडिटी निर्माण होते. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. या भाज्यांमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यानंतर पचनासाठी जड असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी शक्यतो या भाज्यांचे सेवन करू नये. यामुळे पोटात गॅस होतो.
नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन
सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकांना काकडी किंवा कांदा खाण्याची सवय असते. सॅलेडमध्ये किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना कांद्याच्या पदार्थांचे सेवन करू नये. काकडी आणि कांद्यामध्ये उच्च फायबर असते, ज्यामुळे खाल्ले अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी अकाली उठल्यावर उकडलेल्या पदार्थाचे सेवन करावे.
हे देखील वाचा: निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चष्मा घालावा की नाही? जाणून घ्या सविस्तर
नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन
मक्याचे दाणे खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढते. मक्याच्या दाण्यांमध्ये फायबर असते, जे अनेकांना पचत नाही. यामुळे पोटात गॅस होण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये तांदळाच्या पिठापासून बनवलेले आणि आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.