Friendship Day 2025 : खूपच रंजक आहे मैत्री दिनाचा इतिहास; आयुष्यात चांगल्या मित्रांची गरज का असते? जाणून घ्या
आई असो बाप असो भाऊ असो किंवा बहीण असो किंवा इतर अनेक नातेवाईक असो, जसे की आत्या, काका, मामा, मावशी तसेच इतर लांबचे भावंड! हे नातीगोती अशा आहेत, ज्या आपल्याला जन्मता मिळतात. आपल्याला निवड करण्याची संधी मिळत नाही पण फक्त मैत्रीच असे नाते आहे जे आपण आपल्या मनापासून निवडू शकतो. मैत्री हे नातं निवडण्यासाठी आपल्याला बंधन नसतात, मुळात हे नातं रक्ताचं नसलं तरीही रक्ताहून काहीतरी औरच असतं. देवाने आपल्याला या नात्यांमध्ये स्वतःच्या आवडीने निवड करण्याची संधी दिलेली आहे आणि अर्थातच जगातला प्रत्येक माणूस या संधीचा लाभ घेत असतो. प्रत्येकाला मित्रांची गरज ही भासतेच. त्यांचे आभार मानण्यासाठीच आपण दरवर्षी ‘मैत्री दिवस’ साजरा करतो.
Raksha Bandhan 2025 : भावाला करा खुश, घरी बनवा दुबईचा फेमस ‘कुनाफा चॉकलेट’
यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. या दिवशी आपण आपल्या प्रिय मित्रांवर असलेला विश्वास, आदर आणि अर्थातच प्रेम जाहीर करून त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. या दिवशी आपण आपल्या मित्रांसोबत असलेल्या आठवणी ताज्या करू शकतो तर या आठवणींमध्ये आणखीन काही आठवणींची भर घालू शकतो. मित्र म्हणजे आधार! तर तुमच्या या आधारस्तंभासाठी या दिवशी तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकता, आणि या दिवसाला खास बनवू शकता.
आयुष्यात आपल्याला पावलापावलावर मित्रांची गरज भासते. मग ते आनंद असो किंवा काही दुःखाचे क्षण! प्रत्येक अडीअडचणीला धावून येणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मित्रच असतो. जो व्यक्ती आपल्या सुखापेक्षा दुःखात जास्त खंबीर असतो. आपल्या अपयशा वेळी आपल्याला धीर देत असतो आणि कायम आपल्यासाठी एक प्रेरणा म्हणून उभा असतो तोच आपला खरा मित्र असतो. अशा मित्रांना या खास दिवशी भेटवस्तू द्या अन् त्यांचे आभार माना.
फ्रेंडशिप डे चा इतिहास:
फ्रेंडशिप डे ची सुरुवात यूएसए मधून झाली. मुळात ही संकल्पना 1930 मध्ये अमेरिकेतील हॉलमार्क कंपनीने मांडली होती. ग्रीटिंग कार्ड बनवणारी कंपनी हॉलमार्क, आपले कार्ड विकले जाण्यासाठी फ्रेंडशिप डे ची संकल्पना आणली पुढे जाऊन 1958 मध्ये या संकल्पनेबद्दलचा औपचारिक प्रस्ताव पराग्वे देशाने मांडला. हळूहळू ही संकल्पना संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आणि आज आदिवासी जागतिक मैत्री दिवस म्हणून ओळखला जातो.
मैत्री असणे फार गरजेचे असते. पण मित्र ओळखताही आले पाहिजे. मैत्री एकटेपणाला दूर ठेवते, तणावाला दूर ठेवते तर दुःखाच्या वेळी दुःख कमी करण्यासही मैत्रीच उपयोगी येते.
यंदा फ्रेंडशिप डे कधी साजरा होणार आहे?
३ ऑगस्ट
मैत्री दिनाचे महत्त्व काय आहे?
मैत्रीचे बंधन साजरे करण्यासाठी आणि मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.