Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chatruthi 2025: गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं आपण एकसुरात म्हणतो; पण का? वाचा ‘ही’ गोष्ट

गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवात हमखास ही वाक्य आपल्या कानावर पडत असतात, मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपती बाप्पा म्हंटल्यावर मुखातून मोरयाच का बोलले जाते?

  • By मयुर नवले
Updated On: Aug 30, 2025 | 06:04 PM
गणपती बाप्पा म्हटल्यावर आपण मोरया का म्हणतो? (फोटो सौजन्य: iStock)

गणपती बाप्पा म्हटल्यावर आपण मोरया का म्हणतो? (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव म्हंटलं की सर्वात जास्त जल्लोष हा महाराष्ट्रात पाहायला मिळतो. गणरायाच्या नामघोषात राज्यातील प्रत्येक शहरं दुमदुमून  जातात. मंडळ असो की घर, सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण होते. गणपती बाप्पा हा चौसष्ट कलांचा अधिपती असण्यासोबतच विद्येचा सुद्धा देवता आहे. तसेच, कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीला पुजले जाते. त्याचप्रमाणे कुठेही ट्रिपला जाताना किंवा एखाद्या महत्वाच्या कामाची सुरुवात करताना आपसूकच मुखातून ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष होत असतो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की गणपती बाप्पा म्हंटल्यानंतर मोरयाच का बोलले जाते? यामागील कथा तब्बल 600 वर्ष जुनी आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव

गणरायाचे निस्सीम भक्त मोरया गोसावी

पुणे शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर चिंचवड हे गाव आहे. या गावात जन्मलेले मोरया गोसावी हे गणरायाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी ते चिंचवडहून जवळपास 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या अष्टविनायकांपैकी एक मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव येथे दर्शनासाठी जात असत. पुढे त्यांनी याच पवित्र स्थळाला आपले स्थायी निवासस्थान केले. अखंड भक्तीभावाने त्यांनी 42 दिवस तप साधना करून गणरायाला प्रसन्न केले होते.

मोरया गोसावींना बाप्पाचे दर्शन घडले

मोरया गोसावी यांची गणेशभक्ती सर्वत्र पसरली होती. असे म्हंटले जाते की वयाच्या तब्बल 117व्या वर्षापर्यंत ते नियमितपणे मयुरेश्वर गणपती मंदिरात जायचे. मात्र, वृद्धपणामुळे त्यांना त्यांचे शरीर मंदिरापर्यंत जाण्यास हवे तसे साथ देत नव्हते. आपल्याला गणरायाचे दर्शन घडत नाही या विचाराने मोरया गोसावी दुखी होते. अशातच, गणरायाच्या मोरया गोसावींच्या स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिले आणि म्हंटले,”उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.”

अशाप्रकारे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरु झाला!

दुसऱ्या दिवशी चिंचवड येथील कुंडात स्नानासाठी गेलेले मोरया गोसावी स्नानानंतर पूजा करत असताना त्यांना कऱ्हा नदीच्या पात्रा गणरायाची मूर्ती सापडली. गणरायाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. नंतर हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी चिंचवडच्या मंदिरात स्थापित केली. काही वर्षांनी त्यांनी समाधी घेतली आणि त्यांची समाधीही याच मंदिराच्या परिसरात बांधण्यात आली. हे स्थान आज मोरया गोसावी मंदिर (Morya Gosavi Mandir) म्हणून प्रसिद्ध आहे.

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

मोरया गोसावींची गणरायावर इतकी श्रद्धा होती की त्यांचे नाव थेट गणरायाशी जोडले गेले. मग पुढे लोक फक्त ‘गणपती बाप्पा’ न म्हणता आपोआप ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणू लागले. पुण्यातील चिंचवड गावातून सुरू झालेला हा जयघोष आज देशभरात गणेशभक्तांच्या ओठांवर घुमताना ऐकू येतो.

Web Title: Ganesh chatruthi 2025 why we say morya after ganpati bappa who is morya gosavi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • ganeshostav
  • special story

संबंधित बातम्या

International Whale Shark Day 2025 : जगातील सर्वात मोठा मासा आता ‘धोक्यातील प्रजाती’; काय आहे कारण?
1

International Whale Shark Day 2025 : जगातील सर्वात मोठा मासा आता ‘धोक्यातील प्रजाती’; काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025: कुठल्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात पहिले का पूजतात? इतर देवी देवतांना हा मान का नाही?
2

Ganesh Chaturthi 2025: कुठल्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात पहिले का पूजतात? इतर देवी देवतांना हा मान का नाही?

International Day Against Nuclear Tests : जगभरात होणाऱ्या अणुचाचण्या मानवजातीसाठी अत्यंत हानिकारक; वाचा कसे ते?
3

International Day Against Nuclear Tests : जगभरात होणाऱ्या अणुचाचण्या मानवजातीसाठी अत्यंत हानिकारक; वाचा कसे ते?

भुयारामध्ये दडला आहे अनोखा गणराय; धुळ्यातील अद्भुत अन् ऐतिहासिक भुयारेश्वर गणपती मंदिर
4

भुयारामध्ये दडला आहे अनोखा गणराय; धुळ्यातील अद्भुत अन् ऐतिहासिक भुयारेश्वर गणपती मंदिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.