Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sevai Kheer Recipe: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा झटपट शेवयाची खीर! 15 मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Ganesh Festival 2026: गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं असेल, तर शेवयाची खीर हा एक उत्तम पर्याय आहे. उकडीचे मोदक बनवण्यासाठी बराच वेळ लागतो, मात्र शेवयाची खीर अवघ्या ५ ते १० मिनिटांत तयार करता येते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 01:15 PM
Sevai Kheer Recipe: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा झटपट ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Sevai Kheer Recipe: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा झटपट ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट शेवयाची खीर बनवा.
  • ही खीर अवघ्या ५ ते १० मिनिटांत तयार होते.
  • दूध, शेवया, साखर, तूप आणि सुका मेवा हे मुख्य साहित्य आहे.
  • वेलची आणि केशरामुळे खिरीला छान सुगंध आणि चव येते.
 

Vermicelli Kheer Recipe: गणपती बाप्पाचं आगमन झालं की घरात एक वेगळाच आनंद असतो. बाप्पा घरी येणार म्हटल्यावर त्याच्यासाठी काहीतरी गोडधोड खास करायचंच असतं. बऱ्याच जणांच्या घरी पहिल्या दिवशी उकडीचे मोदक केले जातात, तर काही ठिकाणी खीर बनते.पण उकडीचे मोदक म्हटलं की अख्खा दिवस जातो. पीठ मळणं, सारण बनवणं, मोदक वळणं, खूप वेळ लागतो. कामावरून येऊन हे सगळं करणं शक्य होत नाही. जर तुम्हाला पण बाप्पासाठी झटपट काहीतरी गोड बनवायचं असेल तर शेवयाची खीर बेस्ट ऑप्शन आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार होते आणि बाप्पाला पण नैवेद्य म्हणून चालते.

चला तर मग रेसिपी बघूया.खीर बनवण्यासाठी काय लागेल?

बारीक भाजलेल्या शेवया
एक वाटीदूध – अर्धा ते एक लिटर
साखर – दीड ते दोन वाटी (तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार)
साजूक तूप – दोन चमचे
वेलची पूड – अर्धा चमचा
काजू, बदाम, पिस्ता, मनुके, चारोळी – थोडे-थोडे
केशर इसेन्स – 2-3 थेंब (असेल तर)बनवायची पद्धत एकदम सोपी

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

कृती

सगळ्यात आधी एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दूध गरम होत असतानाच त्यात साखर टाका.साखर दुधात छान विरघळते आणि दुधाला गोडवा चांगला येतो. दुधाला एक उकळी येऊ द्या.दूध उकळत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला एक कढई घ्या. त्यात दोन चमचे तूप टाका. तूप गरम झालं की त्यात एक वाटी बारीक शेवया टाका. शेवया आधीच भाजलेल्या असल्या तरी तुपावर परत एकदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यामुळे खिरीला खमंग वास येतो. Sevai Kheer Recipe:

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

शेवया बाजूला काढा आणि त्याच तुपात काजू, बदाम, पिस्ता, मनुके, चारोळी हे सगळं थोडं परतून घ्या. मनुके टाकले की ते फुगतात, छान लागतात. आता जे दूध उकळत आहे त्यात या तुपावर परतलेल्या शेवया आणि सगळा मेवा टाका. गॅस बारीक ठेवा आणि 2-3 मिनिटं हे मिश्रण उकळू द्या. शेवया दुधात मऊ होतील आणि दूध थोडं घट्ट होईल. शेवटी त्यात वेलची पूड आणि केशर इसेन्सचे दोन थेंब टाका. बस, तुमची खीर तयार आहे. ही खीर तुम्ही गरम पण खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पण खाऊ शकता. दोन्ही प्रकारे भारी लागते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर एक नंबर आहे. उकडीच्या मोदकाच्या टेन्शनपेक्षा ही खीर नक्की करून बघा, घरात सगळ्यांना आवडेल.

Web Title: Ganesh festival 2026 quick vermicelli kheer recipe for ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Healhy Lifestyle
  • lifestlye tips
  • Rice Kheer

संबंधित बातम्या

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी
1

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.