राज्यभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठ्या आनंदात आणि जलौषात स्वागत झाले आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्याच्या ताटात कायमच उकडीचे मोदक प्रामुख्याने बनवले जातात. पण मोडकांव्यतिरिक्त तुम्ही नैवेद्यात हे चविष्ट आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडणारे पदार्थ बनवू शकता. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाला नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ दाखवले जातात. चला तर पाहुयात पदार्थांची यादी. (फोटो सौजन्य – pinterest)
गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

गणेश चर्तुथीला नैवेद्यात बाप्पाला २१ उकडीचे मोदक दाखवले जातात. गूळ, खोबऱ्याचा वापर करून बनवलेले सारण आणि तांदळाच्या पिठाची उकड काढून बनवलेले चविष्ट मोदक सगळ्यांचं खूप जास्त आवडतील.

कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यात तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते. दाटसर तांदळाची खीर आणि त्यासोबतच पुरी भाजीचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.

चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी नैवेद्यात पुरणपोळी आणि कटाची आमटीचा नैवेद्य दाखवू शकता.

कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे मालपुवा. गव्हाचं पीठ, साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण तयार केलेले जाते. याच मिश्रणाचे छोटे छोटे मालपुवे बनवले जातात.

गुलाबजाम हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. साखरेच्या पाकात भिजवलेले गुलाबजाम चवीला सुंदर आणि टेस्टी लागतात.






