सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता घरीच कशी कराल (फोटो सौजन्य - iStock)
सण येण्यापूर्वी अनेक घरांमध्ये सोनं बँकेच्या लॉकरमधून काढून सोनाराकडे स्वच्छ करण्यासाठी अथवा चमक परत आणण्यासाठी देण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का? घरच्या घरीदेखील तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची चमक पूर्वीसारखी आणू शकता. चमक परत मिळवण्यासाठी, सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करावेत यासाठी काही सोप्या टिप्स या तुम्ही जाणून घ्या
भांडी धुण्याच्या साबणाने सोन्याचे दागिने तुम्ही स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात लिक्विड डिश डिटर्जंट घाला. चांगल्या परिणामांसाठी, सोडियम-मुक्त सेल्टझर वापरा. त्यातील कार्बन वायूमुळे घाण आणि मळ सैल होण्यास मदत होते. आता, मऊ केसांच्या टूथब्रशने दागिने घासून घ्या आणि वाहत्या पाण्याखाली सोन्याचे दागिने स्वच्छ धुवा. शेवटी, सुती कापडाने दागिने कोरडे पुसून घ्या.
कंबरेखाली सोन्याचे दागिने का घालू नयेत? काय आहे ज्योतिषीय कारण
याशिवाय तुम्ही टूथपेस्टनेही दागिने स्वच्छ करू शकता. एक ते दोन चमचे पाण्यात एक इंच टूथपेस्ट मिसळून पातळ द्रावण तयार करा. तुमची इच्छा असल्यास, दागिन्यांवरील घाण घासून काढण्यासाठी तुम्ही कापड किंवा जुना ब्रश वापरू शकता. शेवटी, स्वच्छ पाण्याखाली दागिने पूर्णपणे धुवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, धुतल्यानंतर दागिने तसेच ओले ठेऊ नयेत अन्यथा त्यावर डाग दिसतात.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने सोन्याचे दागिने स्वच्छ करा. एका भांड्यात पाव कप बेकिंग सोडा आणि दोन मोठे चमचे कोमट पाणी घालून पेस्ट बनवा. पाणी जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्या. ही पेस्ट दागिन्यांवर चोळा. आता, दागिन्यांवरील बेकिंग सोडा काढण्यासाठी ते व्हिनेगरने आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर






