Balushahi Recipe : अगदी हलवाईच्या दुकानात मिळणारी चव आता मिळेल घरीच. सणानिमित्त विकत कशाला, यावेळी घरीच तयार करा शुद्ध, ताजी आणि खुशखुशीत बालुशाही . याची चव कुटुंबातील सर्वांनाच खुश करेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
बालुशाही हे मिष्टान्न आपण आजवर मिठाईच्या दुकानातून खरेदी करुन खाल्लं आहे.
पण तुम्हाला माहितीये का निवडक साहित्यापासून हा पदार्थ घरीच तयार केला जाऊ शकतो.
चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.
सणासुदीच्या दिवसांत किंवा एखाद्या खास प्रसंगी घरच्या घरी गोड पदार्थ बनवायचा असेल, तर बालुशाही हा एक उत्तम पर्याय आहे. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून मऊसर पोत असलेली बालुशाही योग्य पद्धतीने तयार केली तर चवीला अगदी मिठाईच्या दुकानातील पदार्थासारखी लागते. मैदा, तूप, दही आणि साखर यांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून ही मिठाई तयार करता येते. बालुशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे ती थेट गरम तेलात तळण्याऐवजी मध्यम आचेवर सावकाश तळली जाते, त्यामुळे तिचा पोत छान तयार होतो. तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवल्यामुळे तिच्यात गोडवा मुरतो आणि वरून साखरेचा हलका थरही तयार होतो. दिवाळी, दसरा, गणेशोत्सवकिंवा पाहुण्यांसाठी खास गोड पदार्थ म्हणून तुम्ही ही बालुशाही नक्की करून पाहू शकता. चला रेसिपी नोट करून घेऊयात.
एका परातीत मैदा घ्या. त्यात तूप आणि बेकिंग सोडा घालून हाताने चांगले चोळून घ्या. त्यानंतर दही घालून मिश्रण एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालत पीठ तयार करा. पीठ जास्त मळू नका. ते मऊसर आणि किंचित सैल राहू द्या.
तयार पीठ काही मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे समान आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळा हाताने हलका दाबून मध्ये छोटासा खळगा तयार करा. बालुशाहीचा आकार फार पातळ करू नका.
कढईत तेल किंवा तूप गरम करा. तेल खूप गरम झाल्यावर बालुशाही लगेच टाकू नका. मध्यम ते मंद आचेवर
बालुशाही सावकाश तळा. ती आतपर्यंत शिजण्यासाठी वेळ द्या. रंग हलका सोनेरी झाल्यावर त्या बाहेर काढा.
दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन उकळायला ठेवा. पाकाला थोडी घट्टसर consistency येऊ द्या. त्यात वेलची पूड आणि लिंबाचा रस घाला. पाक पूर्णपणे खूप घट्ट करू नका.
तळलेल्या बालुशाही थोड्या कोमट असताना त्या साखरेच्या पाकात घाला. काही मिनिटे त्या पाकात राहू द्या, जेणेकरून साखरेचा गोडवा आतपर्यंत मुरेल.
बालुशाही पाकातून काढून ताटात किंवा जाळीवर ठेवा. थंड झाल्यावर तिच्यावर साखरेचा हलका थर तयार होऊ लागेल. यामुळे बालुशाहीला सुंदर दिसण्यासोबतच खास चवही मिळते.
बालुशाही पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करा. इच्छेनुसार वरून बारीक चिरलेले बदाम किंवा पिस्ते घालून सजवू शकता. हवाबंद डब्यात ठेवून काही दिवस तिचा आस्वाद घेता येतो.