Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नैवेद्यात तुम्ही कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये रस शिरवळे बनवू शकता. हा पदार्थ कोकणात आवर्जून बनवला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2026 | 10:08 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांचं आतुरता लागली आहे. बाप्पाच्या स्वागताची कोकणात मोठ्या जलौषात आणि उत्साहात तयारी केली जाते. यासोबतच बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोकणातील पारंपरिक पदार्थ सण उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. त्यामुळे बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही झटपट खोबऱ्याच्या रसातील पारंपरिक शिरवळे बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो आणि चव सुद्धा भारी लागते. ओल्या खोबऱ्याचा रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले शिरवळे हे कॉम्बिनेशन चवीला भन्नाट लागते. हा पदार्थ चवीला जितका चांगला लागतो तितकाच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. शिरवळे सहज पचन होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात सुद्धा रस शिरवळे खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक

साहित्य:

  • नारळाचे दूध
  • गूळ
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • केशर
  • जिरं
  • हळद
  • तांदळाचे पीठ
  • गरम पाणी
  • तूप
Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी

कृती:

  • कोकणातील पारंपरिक रस शिरवळे बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चमचाभर तूप घाला.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि गरम पाण्यात तांदळाचे पीठ घालून चमच्याने मिक्स करून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून गॅस बंद करा.
  • तांदळाच्या पिठाची उकड थंड झाल्यानंतर हाताला पाणी लावून पीठ मळून घ्या. त्यानंतर तूप लावून झाकण ठेवा.
  • रस बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, जिरं घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून नारळाचा रस काढा.
  • खोबऱ्याचे दूध काढून त्यात हळद, गरजेनुसार गूळ, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले तांदळाचे पीठ शिरवळ्याच्या साच्यात भरून केळीच्या पानावर शेवया पाडून इडलीच्या भांड्यात वाफवण्यासाठी ठेवा.
  • १५ मिनिटं वाफवल्यानंतर गॅस बंद करून शेवया काढा आणि तयार केलेल्या खोबऱ्याच्या दुधासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेले रस शिरवळे. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Ganeshotsav 2026 prepare ras shirvale in the traditional konkan style as an offering for ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • food recipe
  • Ganeshotsav 2026
  • kokan

संबंधित बातम्या

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
1

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त
3

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO
4

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.