Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग

Ganga Expressway : गंगा द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनाचा पर्यटनाला चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना कमीत कमी वेळात भेट देता येईल. यामुळे प्रवासाचा अर्धा वेळ वाचणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 08:49 AM
गंगा एक्सप्रेस वे'चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग

गंगा एक्सप्रेस वे'चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग

Follow Us
Follow Us:
  • नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार.
  • धार्मिक आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोच अधिक सोपी आणि जलद होणार.
  • चांगली कनेक्टिव्हिटी मिळाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश हे नेहमीच आपल्या धार्मिक स्थळांसाठी ओळखले जाते. हे भारतातील एक असे राज्य आहे जिथे असंख्य तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळे पाहता येतात. दरवर्षी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून पर्यटक धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. तथापि बऱ्याच काळापासून या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी लागणारा वेळ आणि सोयीचा अभाव एक मोठे आव्हान ठरत चालले होते. याच पार्श्वभूमीवर, आता गंगा द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनामुळे ही परिस्थिती बदलणार असल्याचे म्हटले जात आहे. हा अंदाजे ५९४ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग मेरठ ते प्रयागराजपर्यंत पसरलेला आहे. यामुळे प्रवासाचा निम्मा वेळ वाचेल. याचबरोबर या मार्गावर राज्यातील अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळेही जोडली जातील ज्यामुळे पर्यटनावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे आपल्याला पाहता येईल.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

गंगा एक्सप्रेसवेमुळे पर्यटनाला किती फायदा होईल?

पूर्वी मेरठ ते प्रयागराज प्रवासाला १० ते १२ तास इतका वेळ लागत होता. पण आता हा वेळ अंदाजे ५-६ तास म्हणजेच अर्ध्यावर येणार आहे. याचा फायदा असा होईल की ज्यांना आठवड्याच्या शेवटी किंवा कमी वेळेत धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करायची असेल त्यांच्यासाठी हा मार्ग खूप फायदेशीर ठरणार आहे. चांगले रस्ते, जलद कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित प्रवास यामुळे पर्यटनाला अनुभव आणखी सुधारेल.

धार्मिक पर्यटनाला चालना

गंगा द्रुतगती मार्गाचा धार्मिक पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येईल. हा मार्ग गढमुक्तेश्वर, कल्की धाम, बेलहा देवी धाम, चंद्रिका देवी मंदिर आणि त्रिवेणी संगम यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जोडेल. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणांना भेट देतात. अशात या नव्या मार्गामुळे येथे पोहचणे आणखीनच सुखकर आणि सोपे होईल.

Travel News : 6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन… IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज

कोणती धार्मिक शहरे जोडली जातील?

गंगा द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनामुळे उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख धार्मिक शहरे अधिक चांगल्या प्रकारे जोडली जातील. यामुळे प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यास मदत होईल. हा द्रुतगती मार्ग प्रयागराजला वाराणसी आणि विंध्याचल धाम यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांशी जोडतो. अयोध्या आणि गोरखनाथ मंदिरासारखी तीर्थक्षेत्रांचीही यामुळे सुलभ यात्रा करता येईल. नैमिषारण्यसारख्या प्रख्यात स्थळांना जाणे या मार्गामुळे अधिक सुलभ होईल. श्रीरामांच्या संबंधित असलेल्या चित्रकूटला देखील यामुळे पोहचणे सोपे जाईल. यामुळे आता मथुरा आणि वृंदावनासारख्या प्रसिद्ध धार्मिक शहरांमध्येही पर्यटकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. या नवीन मार्गामुळे एकंदरीतच राज्यभरातील धार्मिक पर्यटनाला लक्षणीय चालना मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Ganga expressway tourism benefits religious places connected travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम
1

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई
2

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
3

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
4

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.