(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
IRCTC च्या या नवीन पॅकेजचे नाव ‘शिर्डी साई दर्शनासह ६ ज्योतिर्लिंग दर्शन (EZBG30)’ असे आहे. हे पॅकेज १२ दिवस आणि ११ रात्रींचे आहे. झारसुगुडा जंक्शनपासून या टूरची सुरुवात होईल. ही यात्रा विशेषत: अशा भाविकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना कमी वेळेत सोयीस्कर पद्धतीने शक्य तितक्या जास्त धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे. श
कोणत्या पवित्र स्थळांना भेट दिली जाईल?
हा प्रवास केवळ मंदिरांना भेट देण्यापुरता मर्यादित नाही, तर एक खरोखरच आरामदायी अनुभव आहे. आरामदायक रेल्वे प्रवासापासून, भोजन आणि निवासापर्यंत तसेच प्रक्षणीय स्थळे पाहण्यासाठीच्या वाहनापर्यंत सर्वकाही पूर्वनियोजित असेल. यामुळेच या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीशी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आरामात कोणत्याही चिंतेशिवाय तुमच्या या टूरचा आनंद लुटु शकता आणि देवाच्या भक्तीत दंग होऊ शकतात.
किती पैसे लागतील?
या दिव्य पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,३१५ रुपये पासून सुरु होते. यामुळे सामान्य यात्रेकरुंना हे टूर पॅकेड परवडण्याजोगे ठरते. या किमतीत तुमच्या प्रवासादरम्यानच्या सर्व सोईसुविधांची काळजी राखली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना वेगळी व्यावस्था करण्याची गरज भासणार नाही.






