लग्न जीत अडानीचे चर्चा या महाराष्ट्रीयन साडीची (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचे लग्न दिवा शाह हिच्याशी ७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज होणार आहे. गौतम अदानी त्यांच्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. म्हणूनच, या लग्नाच्या तयारीत, देशाच्या विविध भागातील स्थानिक कारागिरांनी या लग्नात अनोख्या डिझाईन्स आणि भव्यतेचा समावेश केला आहे. लग्नात पाहुण्यांना देण्यासाठी खास हस्तनिर्मित भेटवस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे.
अदानी यांनी दिल्लीस्थित एनजीओ फॅमिली ऑफ डिसेबल्डसोबत भागीदारी केली आहे. जोडप्यासाठी हाताने रंगवलेल्या शाल बनवण्याचे काम देण्यात आले आहे, जे संपूर्णतः हँडमेड असेल. अहवालानुसार, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने या कारागिरांना हस्तकलेत राजेशाही आणि भव्यता जोडण्यासाठी मार्गदर्शन केले आहे आणि संपूर्ण डिझाईन केले आहे (फोटो सौजन्य – @kapsepaithaniofficial Instagram)
लग्नाची तयारी खास पद्धतीने
ज्युनियर अदानीच्या लग्नात पाहुण्यांसाठी खास वस्तू तयार करण्यासाठी अदानी कुटुंबाने चेन्नई येथील काई रस्सी आणि जोधपूर येथील बिजाजी चुरी वाला यांना काम दिले आहे आणि त्यांच्याकडून सर्वाधिक सुंदर असे काम मिळेल अशी आता सर्वांना अपेक्षा आहे. काई रस्सी लग्नासाठी फलक आणि डिजिटली प्रिंटेड प्लेट्स बनवत आहेत. तर बिबाजी चुरी वाला यांना जीतच्या होणाऱ्या पत्नीसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या डिझाइन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
राजघरण्यातील महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी; कोण आहेत या सौंदर्यवती ?
नाशिकहून पैठणी साड्या
वृत्तानुसार, अहमदाबादमधील कलाकार निकिता मणी असलेले कमरपट्टे डिझाइन करत आहे आणि महाराष्ट्रातील नाशिकमधील किमान ४०० कारागिरांना लग्नातील पाहुण्यांसाठी हाताने विणलेल्या पैठणी साड्या बनवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. देशभरात असे लोक आहेत ज्यांना महाराष्ट्राची पैठणी साडी आवडते. ही साडी बनवण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही ऑर्डर दिल्या जातात.
किती असेल किंमत
एका पैठणी साडीची किंमत ११ लाख रुपयांपर्यंत असू शकते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पैठणी साडीचे अनेक कारखाने आहेत. पैठणी साडी बनवण्यासाठी लागणारा वेळ तिची किंमत वाढवण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच ते खरेदी करणे स्वप्नासारखे आहे. गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याने दिवा जैमिन शाह यांच्याशी लग्नासाठी जगदीशजी शंकरी पैठणी साड्या, नाशिक, महाराष्ट्र येथून पैठणी साड्या मागवल्या. लग्नात या साड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पैठणी साड्या ही महाराष्ट्राची शान आहे आणि आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून या महागड्या पैठणी साड्या दिल्या जाणार असल्याचे वृत्त सध्या आहे.
‘पदरावरतील जरतारीचा मोर नाचरा हवा’, पैठणीचे आहेत अनेक प्रकार, जाणून घ्या वेगवेगळे डिझाईन्स
लग्नात भारतीय परंपरेच्या कलाकृती
लग्नात नेल आर्ट तंत्राचा वापर करून बनवलेले बुकमार्क, काचेच्या कलाकृती आणि वडील-मुलाने बनवलेल्या मातीच्या कलाकृती अशा अनेक डिझाइन केलेल्या हस्तनिर्मित वस्तूंचा समावेश होता. या हाताने विणलेल्या आणि हाताने रंगवलेल्या वस्तू भारताच्या कलात्मक प्रतिभेचे दर्शन घडवतील. महाराष्ट्रातील प्रत्येक वधूचे स्वप्न असते की तिने पैठणी साडी नेसून लग्न करावे. या साडीला भारतात आणि परदेशात खूप मागणी आहे. येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून ती देण्यात आली.