राजघराण्यातील महाराणीने सोन्याची जर असलेली पैठणी परिधान केल्याचे फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राजघरण्यातील महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी; कोण आहेत या सौंदर्यवती ?
बडोद्याच्या गायकवाड घराण्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांचे 100 वर्ष जुनी काळ्या रंगाच्या पैठणीतील फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.
महाराणी राधिकाराजे यांना फोर्ब्सने भारतातील सौंदर्यवती असा किताब देखील दिला आहे.
महाराणी राधिकाराजे या सौंदर्यवती असण्याबरोबरच उच्चशिक्षित आहेत. भारतीय इतिहासात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
राधिकाराजे यांनी 2002 मध्ये बडोद्याचे महाराजा समरजितसिंहराव गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
राधिकाराजे गायकवाड यांनी परिधान केलेली नऊवारी पैठणी तब्बल 100 वर्ष जुनी आहे.
या पैठणीचा पदरावर सोनेरी जरीचं आकर्षक नक्षीकाम केलं आहे.
गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस या भल्या मोठ्या राजवाड्यात राधिका राजे गायकवाड या महाराणीसारख्या राहतात.