नव्या वर्षांत शनी, शुक्र आणि राहूसह अनेक ग्रहांचं राशीत परिवर्तन होणार आहे. नवं वर्ष सगळ्यांसाठीच नवी आशा घेऊन आलेलं आहे. नवं वर्ष २०२३ हे मिथुन राशीतील व्यक्तींसाठी लाभाचं ठरणार आहे. मिथून रास असणाऱ्यांना व्यापार आणि करिअरमध्ये नवं वर्ष लाभदायक ठरेल. मात्र थओडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कसं असेल २०२३ हे वर्ष घ्या जाणून…
[read_also content=”वृषभ राशीचे शाशईफल २०२३- वृषभ रास असणाऱ्यांसाठी कसे असणार वर्ष २०२३? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य? https://www.navarashtra.com/lifestyle/taurus-horoscope-this-year-how-will-the-year-be-for-raurus-people-know-the-yearly-horoscope-358368.html”]
व्यापार आणि करिअर
१७ जानेवारी रोजी शनी रास बदलतोय. याचा फायदा मिथुन राशीला होणार आहे. जगण्यात तुम्ही इच्छित असलेल्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. २०२३ या वर्षात तुमचं ध्येय गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यापूर्वी तुम्ही केलेले प्रयत्नही फळास जाण्याची शक्यता आहे. व्यापरात गती मिळेल. नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यातही यावर्षी तुम्हाला सफलता मिळणार आहे. ज्या ठिकाणी कार्यरत आहात, त्या ठिकाणी वरिष्ठ पदावर प्रमोशन होण्याची शक्यता आहे. पगारातही चांगली वाढ होईल.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रगती – एप्रिल ते जून या महिन्यांत खर्च वाढण्याची शक्यता आहे, पैसे जपून वापरा. जुलै ते सप्टेंबर या काळात वैयक्तिक बाबीत यश मिळेल. वैयक्तिक प्रयत्न मात्र सोडू नका. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कष्टांचं फळ तुम्हाला पाहायला मिळेल. यशाचा मार्ग गतीमान आणि सोपा असेल. घर, वाहन, जमिनी खरेदीच्या शक्यता आहेत.
कुटुंब आणि प्रकृती – तुम्ही कुटुंबासाठी सर्वोतोपरी प्रयत्न कराल. कुटुंबीयांसोबत आनंदात हे वर्ष जाणार आहे. सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे. प्रकृती चांगली राहील. ज्येष्ठांचा आशीर्वाद राहणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. मात्र ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कुटुंबातील संबंधात तणाव वाढण्याची शक्यता आहे. जुलैपर्यंत मात्र सगळे व्यवस्थित राहील. ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा कौटुंबिक जगण्यात आनंद असेल. घरात सुबत्ता राहील.
लव्ह लाईफ– या वर्षभरात प्रेम संबंधात चढ-उतार असण्याची शक्यता आहे. एप्रिलनंतर समस्या येतील. मात्र महिना संपेपर्यंत पुन्हा परिस्थइती अनुकूल होताना दिसेल. एक-दुसऱ्यांबाबत पुन्हा आकर्षण वाढेल. अविवाहितांसाठी लग्नांचे प्रस्ताव येतील.