
फोटो सौजन्य - Social Media
हिवाळ्याचा निरोप घेऊन उन्हाळ्याची चाहूल लागताच रंगांचा सण होळी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांची उधळण, पाण्याचे फवारे आणि आनंदी वातावरण यामुळे हा सण सर्वांच्या आवडीचा असतो. मात्र, बदलते हवामान, कडक ऊन आणि केमिकलयुक्त रंग यांचा त्वचा व केसांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होळीचा आनंद घेताना त्वचेची आणि केसांची योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर The Body Shopने होळीपूर्वी आणि होळीनंतरच्या स्किन व हेअर केअरबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
होळीपूर्वी त्वचेची तयारी करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्वचेवर आधीपासून योग्य संरक्षण असेल तर रंगांचा दुष्परिणाम कमी होतो. सर्वप्रथम चेहऱ्याची स्वच्छता आवश्यक आहे. टी ट्री स्किन क्लीअरिंग फेशिअल वॉश त्वचेतील घाण, अतिरिक्त तेल आणि अशुद्धी काढून टाकतो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी राहते. त्यानंतर व्हिटॅमिन ई हायड्रेटिंग टोनर वापरल्यास त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो आणि ती मऊ राहते.
याशिवाय त्वचेचा मॉइश्चर बॅरियर मजबूत करणे गरजेचे असते. व्हिटॅमिन ई बॅरियर बूस्ट क्रीम त्वचेला दीर्घकाळ हायड्रेशन देत तिचे संरक्षण करते. उन्हापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. स्किन डिफेन्स मल्टी-प्रोटेक्शन लाइट एसेन्स एसपीएफ ५० पीए+++ हे हलके आणि न चिकटणारे फॉर्म्युला असून त्वचेला प्रभावी सूर्यसंरक्षण देते. होळी खेळण्यापूर्वी भरपूर मॉइश्चरायझर लावल्यास रंग त्वचेत खोलवर शिरत नाहीत. केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. होळीपूर्वी केसांना तेल लावल्यास रंग आणि केमिकल्सपासून संरक्षण मिळते. केसांवर एक प्रकारचा प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होतो, ज्यामुळे केस कोरडे आणि नुकसानग्रस्त होण्यापासून वाचतात.
होळीनंतर त्वचेची सौम्य स्वच्छता आणि पोषण यावर भर देणे गरजेचे असते. अनेकजण रंग काढण्यासाठी जोरात घासतात, पण त्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ शकते. त्याऐवजी सौम्य क्लेन्सिंग उत्पादने वापरणे योग्य ठरते. ड्यूबेरी बाथ अँड शॉवर जेल त्वचेवरील रंगांचे अंश हलक्या पद्धतीने दूर करून ताजेतवानेपणा देतो. त्यानंतर त्वचेला पोषण देण्यासाठी मॉइश्चरायझिंग अत्यंत गरजेचे असते. शिया बॉडी बटर अतिशय कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त असून ती सखोल पोषण देऊन त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. सतत हायड्रेशन मिळाल्यामुळे त्वचा पुन्हा निरोगी दिसू लागते.
केसांसाठी बनाना ट्रूली नरिशिंग शॅम्पू वापरल्यास कोरडे आणि विस्कटलेले केस मऊ व सुटसुटीत होतात. त्यानंतर शिया इंटेन्स रिपेअर हेअर मास्क वापरल्यास केसांना आतून पोषण मिळते आणि त्यांची मजबुती वाढते. त्यामुळे होळीनंतर केसांची चमक आणि आरोग्य टिकवून ठेवणे शक्य होते. तज्ज्ञांच्या मते, होळी साजरी करताना शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा. तसेच, पुरेसे पाणी पिणे आणि त्वचेची नियमित काळजी घेणेही आवश्यक आहे. योग्य तयारी आणि नंतरची निगा यामुळे त्वचा व केसांवर होणारा ताण कमी होतो. The Body Shopचा विश्वास आहे की, सण साजरा करताना सौंदर्य आणि आरोग्य यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. योग्य स्किन आणि हेअर केअर रूटीन अवलंबल्यास होळीचा आनंद अबाधित राहतो आणि सणानंतरही त्वचा व केस निरोगी, संतुलित आणि तेजस्वी राहतात.