केस गळतीची समस्या होईल कायमची दूर!
बदलते वातावरण, धावपळीची जीवनशैली, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा दिसून येतो. वारंवार केस गळणे, केसांमध्ये कोंडा वाढणे, अचानक केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा किंवा हेअर केअर सीरम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. पण महागड्या हेअर केअर प्रॉडक्टमुळे केसांची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. केसांमधील नैसर्गिक तेल कमी झाल्यानंतर केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा वाढणे किंवा इतरही केसांच्या समस्या उद्भवू लागतात. टाळूवरील इन्फेक्शन वाढल्यानंतर केस अतिशय कमकुवत होतात. तरुण वयात लहान मुलांसह मोठ्यांमध्ये सतत केस गळून टक्कल पडण्याची भीती असते.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या वाढीसाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. महागड्या ट्रीटमेंट केल्यामुळे काही दिवस केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. मात्र पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील खास आयुर्वेदिक उपाय करून पाहावेत. आयुर्वेदिक आणि घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. याशिवाय केस तुटणे किंवा केस गळतीच्या समस्या कमी होऊन केसांची मूळ मजबूत होतील.
एक ग्लास चमचाभर तूप घेऊन त्यात केशर काड्या आणि अश्वगंधा पावडर टाकून मिक्स करा. तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. यामुळे केवळ केसांचं नाहीतर संपूर्ण आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करावे. शरीरातील सर्व धातू संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस वाढण्यास मदत होते.
फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर
निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात साजूक तुपाचे सेवन करणे आवश्यक आहे. तूप खाल्यामुळे शरीराला आतून उष्णता मिळते. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. साजूक तुपामध्ये विटामिन ए, डी, ई आणि के इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. केसांना मजबूत, चमकदार आणि घनदाट बनवण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे. केशरमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. केशरचे सेवन केल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.