Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट आणि फ्रेश ठेवतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 09:38 AM
महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा 'या' पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा 'या' पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

Follow Us
Follow Us:

तासनतास लॅपटॉप, मोबाईल स्क्रीन पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना इजा होते. याशिवाय डोळ्यांभोवती काळी वर्तुळ वाढू लागतात. डोळ्यांभोवती वाढलेली काळी वर्तुळ कालांतराने अतिशय गडद होत जातात, ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी करून टाकतात. मानसिक तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे डार्क सर्कल्स वाढतात. डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे लोशन, क्रीम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. पण यामुळे फारसा बदल दिसून येत नाही. वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. काळी वर्तुळ लपवण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार करतात. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेलाचा वापर करण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील कोलेजन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे! कोरडी फळे म्हणजे उत्तम पर्याय

डोळ्यांभोवती वाढलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. यात विटामिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लॉरिक ॲसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. डोळ्यांखालील त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याआधी ते डोळ्यांना सूट होईल की नाही याची योग्य खात्री करावी. डोळ्यांखालील त्वचेला ओलावा कमी झाल्यानंतर काळी वर्तुळ येण्यास सुरुवात होते. अशावेळी खोबरेल तेल डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या वर्तुळांवर लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि डोळे अतिशय चमकदार वाटतात.

त्वचेच्या पेशी नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण डोळ्यांभोवती लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोळे चमकदार आणि सुंदर होतील. मसाज केल्यामुळे डोळ्यांभोवती असलेल्या त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. काहीवेळ ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते.

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात बदाम तेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी डोळ्यांभोवती लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि डेड स्किन नष्ट होईल. बदाम तेलात विटामिन ई युक्त अनेक गुणकारी घटक आढळतात, ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Forget about applying expensive eye cream forever use rs 10 coconut oil in this way your face will look fresh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.