
ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? 'हा' सोपा टूर प्लॅन येईल कामी
समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
हंपीमध्ये या ठिकाणांना नक्की भेट द्या
विरुपाक्ष मंदिर
हे मंदिर भगवान शिवाला समर्पित इथल्या सर्व खास मंदिरांपैकी हे एक आहे. आजही इथे नित्यनियमाने पूजा-अर्चा केली जाते. मंदिराचे उंच गोपुरम दुरूनही दिसते, हे मंदिर हंपी बाजाराजवळ वसलेले आहे.
विजय विठ्ठल मंदिर आणि स्टोन चॅरियट
या मंदिराची गणना हंपीतील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरांमध्ये केली जाते. मंदिरात अतिसुंदर कोरीव काम केलेले स्तंभ पाहायला मिळतात. या स्थळाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रॅनाइट दगडात कोरलेला आणि भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाला समर्पित असलेला दगडी रथ आहे. याच्या शेजारी हत्तीच्या मूर्त्या आहेत. तुम्हाला हे मंदिर ५० रुपयांच्या नोोटेवरही पाहायला मिळेल.
लोटस महाल
इथे गेल्यावर तुम्ही लोटस महालदेखील पाहू शकता. हे महल राॅयल सेंटरमध्ये असून याची डिजाईन कमळासारखी करण्यात आली आहे. यामुळेच याला लोटस म्हणजेच कमळ असे नाव देण्यात आले आहे. बाल्कनी, कमानी आणि एकूणच रचना या ठिकाणाला इतर मंदिरांहून वेगळी बनवते.
हंपी बाजारपेठ
हंपीला भेट दिली तर येथील बाजारपेठात जायला विसरु नका. विजयनगर साम्राज्याच्या काळापासून ही बाजारपेठ सुरु असून त्याकाळी हे मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते.बाजाराच्या रस्त्यावर आजही तुम्हाला प्राचीन दगडी मंडप पाहायला मिळतील. त्याकाळी हंपी बाजारपेठेत हिरे, मोती, घोडे आणि मसाल्यांचा व्यापार होत असे.
असे गाठा हंपी…