
पोट आणि मांड्यांचा आकार बदलला आहे? मग उपाशी पोटी करा 'या' गुणकारी पानांचे सेवन
Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंब्याची पाने उपलब्ध असतात. आंब्याचा सीजन सुरु झाल्यानंतर आंब्याच्या पानांपेक्षा फळाला जास्त मागणी असते. पण आंब्यासोबतच आंब्याची पाने सुद्धा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. आंब्याच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीरातील गंभीर आजारांपासून सुटका मिळवून देतात. या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, फायाटोन्युट्रिएंट्स, अल्कलॉईड, बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनोईड्स, विटामिन ए, विटामिन बी आणि विटामिन सी इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आंब्याची पाने प्रभावी ठरतात.
आंब्याच्या पानांमध्ये असलेले मँगिफेरिन अर्क चयापचय सुधारण्यास मदत करते. शरीरात वाढलेला लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आंब्याची पाने गुणकारी ठरतात. शरीरात साचून राहिलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांचे सेवन करावे. आंब्याच्या पानांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी चहा तयार करू शकता. या चहाचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारते. याशिवाय आंब्याच्या पानांचा चहा बनवून प्यायल्यामुळे उच्च रक्तदाब, ब्लड शुगर आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. आंब्याच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
वजन कमी करण्यासाठी कोणते फळ चांगले आहे?
सर्व फळे आरोग्यासाठी चांगली आहेत, पण सफरचंद, केळी, आणि बेरीज (berries) फायदेशीर आहेत.
वजन कमी करण्यासाठी कोणते पीठ चांगले आहे?
मल्टीग्रेन पीठ, बाजरीचे पीठ, किंवा ज्वारीचे पीठ खा.
वजन कमी करण्यासाठी उपवास करणे योग्य आहे का?
उपवास करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.