महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रभावी ठरतील 'या' बिया
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. तसेच धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र असे केल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. हल्ली बदलत चाललेली जीवनशैली, कामाचा तणाव, कुटुंबातील तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा वाईट परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा तणाव वाढल्यानंतर महिलांना जेवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. यामुळे आरोग्य बिघडून अनेक समस्या उद्भवू शकतात. महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू लागले आहे. वाढत्या वयानुसार अनेक आजार वाढू लागले आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन खाण्यापिण्याच्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शारीरिक समस्या उद्भवू लागल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि पीसीओएस सारख्या गंभीर समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. भोपळ्याच्या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. या बिया महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. शिवाय या बियांचे सेवन तुम्ही स्मूदी किंवा ओट्ससोबत करू शकता. भोपळ्याच्या बिया शरीरातील होर्मोन्स नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. याशिवाय पीसीओएस सारख्या आजारामध्ये महिलांच्या शरीरातील हार्मोनसचे संतुलन ढासळून जाते.त्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारात भोपळ्यच्या बियांचे सेवन करावे. मासिक पाळीतील वेदना, त्वचेवर आलेले मुरूम, पिंपल्स कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर आहेत.
शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांमध्ये असलेले घटक वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. या बियांमध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे सतत भूक लागत नाही. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते आणि वजन कमी होते. तसेच शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया अतिशय फायदेशीर आहेत.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय या बियांमध्ये असलेले कॅल्शियम हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नियमित मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि मॅग्नेशियम हे घटक अधिक आढळून येतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.