तुपाचे शरीरासाठी होणारे फायदे
हिवाळा हा आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आहे. थंड हवा आणि कमी तापमानामुळे आपले शरीर आतून उबदार ठेवण्याची आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्याची गरज आहे. आधीच पौष्टिक असलेल्या डाळी आणि सूपमध्ये तूप मिसळून पिणे हिवाळ्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकते. भारतीय अन्नाचा अविभाज्य भाग असलेले तूप केवळ चवच वाढवत नाही तर त्यात असलेली आवश्यक फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात.
तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिवाळ्यात मसूर आणि सूपमध्ये तूप मिसळून पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. या विषयावर दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या आहारत्जज्ञ सना गिल यांनी अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
तूप पचनतंत्र वाढवते
तुपामुळे पचनक्रिया चांगली होते
हिवाळ्यात पचन मंदावते. तुपामध्ये ब्युटीरिक अॅसिड असते, जे आतडे निरोगी ठेवते आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे कडधान्ये आणि सूप हलके आणि सहज पचायला लागतात. यासाठी हिवाळ्यात जेव्हा तुम्ही सूप पिता अथवा डाळीची आमटी खाता तेव्हा त्यात तुपाचा एक चमचा मिक्स करावा. याचा स्वाद वेगळा येतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते
इम्युनिटी वाढविण्यास उपयोग
इम्युनिटी वाढविण्यासाठी तुपाचा अधिक उपयोग
तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. हिवाळ्यात तूप-युक्त सूप किंवा तूप समृद्ध कडधान्ये सेवन केल्याने शरीर थंडी आणि इतर हंगामी संसर्गापासून शरीर सुरक्षित राहते. याशिवाय तुपाच्या सेवनाने शरीर आतून उबदार राहण्यास मदत करते. थंडीच्या वातावरणात मसूरडाळ आणि सूपमध्ये तूप मिसळून प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि थंडीपासून बचाव होतो. तुम्ही रोज 1 ते 2 चमचे तूप खाऊ शकता.
शरीराचे उत्तम डिटॉक्स होते
शरीराच्या उत्तम डिटॉक्सिफिकेशनसाठी
तुपाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. डाळी आणि सूपसोबत ते आतडे स्वच्छ ठेवते आणि चयापचय सुधारते. हिवाळ्यात डाळी आणि सूपमध्ये तूप मिसळून प्यायल्याने चव तर वाढतेच शिवाय शरीराला उष्णता, ऊर्जा आणि रोगांपासून संरक्षण मिळते. आपल्या नियमित आहारात याचा समावेश करून हिवाळ्यात आपले आरोग्य अधिक निरोगी बनवता येते
एनर्जी आणि हाडांसाठी
हाडं बळकट करण्यासाठी आणि एनर्जी वाढविण्यास उत्तम
तुपात असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्याच्या प्रक्रियेत मदत करते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. कडधान्य, सूप यांसारख्या पौष्टिक अन्नासोबत तूप सेवन करणे हाडांसाठी फायदेशीर आहे. तूप हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात थंडीमुळे शरीराला थकवा जाणवतो, पण तूपयुक्त डाळी आणि सूप प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तुप मिक्स केलेले सूप किंवा कडधान्य खाल्ल्याने हिवाळ्यात थकवा येत नाही
त्वचेला मऊपणा
त्वचेवर मऊपणा आणण्यासाठी तुपाचा करा वापर
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे. तुपातील फॅटी ॲसिड त्वचेला आतून पोषण देतात आणि तिला ओलावा देतात. तुपाचे सेवन केल्यास कोरड्या त्वचेची समस्या टाळता येते. तसंच तुम्ही हिवाळ्यात तूप त्वचेलादेखील लाऊ शकता आणि यामुळे त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते.
विटामिन के युक्त तुपाचे ‘या’ पद्धतीने करा नियमित सेवन, आरोग्याला होतील भरभरून फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.