Ghee Eating Benefits: तूप खाण्याने वजन वाढते असं म्हटलं जातं. मात्र प्रमाणात तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी तुम्ही तूप नियमित खायला हवं. जेव्हापासून लोकांना आपल्या वजनाची जाणीव झाली आहे, तेव्हापासून त्यांनी तुपाचे सेवन कमी केले आहे. पण तूप फक्त वजन वाढवते, हा मोठा गैरसमज आहे. खरे तर तुपाचे फायदे माहीत असतील तर तुपाशिवाय तुम्ही पदार्थ खाणारच नाही. आयुर्वेदापासून तुपाचे महत्त्व अनेक वर्ष सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी तुपाचे 7 फायदे सांगितले आहेत, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांपासून ते आजच्या वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत, शतकानुशतके तूप एकंदर आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे
पौष्टिक आणि सुगंधी तूप अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीने समृद्ध आहे. मात्र, तुपाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्हाला ते योग्य प्रमाणात खावे लागते असे डॉक्टर सांगतात
आयुर्वेदानुसार तूप शरीराच्या ऊती तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने पित्तदोषही कमी होते आणि तुम्ही अधिक निरोगी राहता
तुपात असलेले हेल्दी फॅट्स, जसे की ओमेगा ३ फॅटी ॲसिड मेंदूला त्याच्या कार्यात मदत करतात. स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमतादेखील मजबूत होते
तुपामध्ये ब्युटीरेटचे प्रमाण असून हा एक प्रकारचा शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे जो पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. तूप पाचन तंत्राच्या पेशींचे पोषण करते आणि जळजळ कमी करते
तुपात असलेले नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स अर्थात जीवनसत्त्वे ए आणि ई शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, संसर्गजन्य रोगांचा धोका राहत नाही
व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह तुपात फॅटी ॲसिड त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. तूप खाल्ल्याने त्वचेवर खाज सुटणे आणि पुरळ उठणे थांबते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार दिसते
तुपातील हेल्दी फॅट तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुम्ही वारंवार जेवत नाही. हे चयापचय सुधारते
तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते जे मर्यादित प्रमाणात घेतल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तूप एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते
तुपातील हेल्दी फॅट हार्मोन्स निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी विशेषतः महिलांमध्ये खूप उपयुक्त आहे
तुपात जास्त कॅलरीज आणि फॅट असल्याने ते मध्यम प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही रोज 1 ते 2 चमचे तूप घेऊ शकता. जास्त तूप खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.