
नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयावर यशस्वी उपचार! ५ मिमीचा अडथळा दूर करत श्वसनसंसर्गाचा त्रास थांबविण्यात येणार यश
Health Update: अवघे नऊ महिने वय, वजन केवळ पाच किलो आणि त्यात वारंवार होणारे श्वसनसंसर्ग. प्रत्येक आजारपणानंतर तिच्या पालकांची चिंता वाढत होती. वजन वाढत नव्हते, हृदयावर ताण येत होता. तपासणीत तिच्या हृदयातील जन्मजात दोष समोर आला. मात्र, मोठी शस्त्रक्रिया न करता कॅथेटरद्वारे उपचार करत ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालयातील विभागाने या चिमुकलीच्या सदस्या दूर केली. अन्य कार्य मिलिटरीया ‘पेटंट डक्टस आर्टेरिओसस’ला विशेष उपकरणाच्या साहाय्याने बंद करण्यात आले. उपचार यशस्वी झाल्यानंतर पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर वारंवारच्या आजारपणातून बाहेर पडून आता चिमुकलीला निरोगी बालपणाची नवी सुरुवात मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य – AI)
जे. जे. रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना विविध प्रगत हृदयरोग उपचार मोफत उपलब्ध आहेत. यामध्ये अँजिओप्लास्टी व स्टेंट, हात-पायांसह इतर धमन्यांवरील कॅथेटर उपचार, मिट्रल, अॅऑर्टिक, पल्मोनरी व ट्रायकस्पिड झडपांवरील बलून प्रक्रिया, एएसडी, व्हीएसडी व पीडीए यांसारख्या जन्मजात हृदयदोषांवरील उपचार तसेच पेसमेकर, एआयसीडी, सीआरटी आणि कंडक्शन सिस्टीम पेसिंगवा समावेश आहे. याशिवाय छातीवरून व अन्ननलिकेतून केली जाणारी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस इको, जन्मजात हृदयदोषांची तपासणी तसेच गर्भातील बाळाच्या हृदयाची इको तपासणीही उपलब्ध आहे.
पीडीए म्हणजे जन्मानंतर बंद होणे अपेक्षित असलेली महाधमनी आणि फुफ्फुसाची धमनी यांना जोडणारी रक्तवाहिनी उघडी राहते. या बालिकेत पीडीएचा आकार मोठा असल्याने फुफ्फुसांकडे अतिरिक्त रक्तप्रवाह होत होता. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊन श्वसनाच्या तक्रारी, वारंवार संसर्गाची समस्या निर्माण झाली होती. डॉ. हरिओम कोळपकर व त्यांच्या टीमने ही प्रक्रिया केली. हृदय व वक्ष शल्यचिकित्सा, भूलशास्त्र आणि बालरोग विभागाने उपचारांमध्ये भूमिका बजावली. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या समन्वयातून उपचार पूर्ण केले.
66 एवढ्या कमी वजनाच्या बालिकेवर उपचार करताना तिचे वय, वजन आणि हृदयाची स्थिती या तिन्ही बाबी आव्हानात्मक होत्या. मात्र, वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्याने मोठी शस्त्रक्रिया टाळता आली. हृदयातील दोष बंद झाल्यामुळे तिच्या वाढीसाठी आणि पुढील आरोग्यासाठी सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती – डॉ. अनंत मुंडे, हृदय विभाग प्रमुख, जेजे यांनी दिली.