सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
अपचन होण्याची कारणे?
ब्लोटींग कशामुळाे होते?
आहारात कोणते बदल करावेत?
Gut Health: हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच कायम पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात ताण जाणवणे, गॅस होणे, ढेकरा येणे किंवा पोट जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी ब्लोटिंगच्या समस्या उद्भवतात. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, झोपेच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. पचनाशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही, पण कालांतराने समस्या आधिक गंभीर होतात आणि संर्पूण शरीरीचे नुकसान करतात. घाईघाईने जेवणे, खाताना जास्त हवा गिळल्याने इत्यादी कारणांमुळे पोटात हवा साचू राहते. कार्बोनेटेड पेये, जास्त तेलकट पदार्थ, अतिप्रमाणात खाणे आणि खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे भविष्यात शरीराचे नुकसान होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
रोजच्या आहारात राजमा, चणे, काही कडधान्ये, कोबी, कांदा यांसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर ते पचन होताना अनेकांच्या आतड्यांमध्ये जास्त वायू तयार होतो. कब्ज हे पोट फुगण्याचे एकमेव कारण आहे. आहारात होणाऱ्या छोट्यामोठ्या चुकांचा थेट शरीरावर परिणाम दिसून येतो. शौच नीट न झाल्यामुळे आतड्यांमध्ये मल जास्त वेळ तसाच साचून राहतो. ज्याच्या परिणामांमुळेपोटात जडपणा, ताण आणि गॅस वाढण्याची जास्त शक्यता असते. दिवसभर पुरेसे पाणी न पिणे, आहारात फायबरचे कमी प्रमाणात सेवन करणे, शारीरिक हालचाल न करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो.
दुग्धजन्य पदार्थांमधील लॅक्टोज असते जे काही सहज पचन होत नाही. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्दा ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी किंवा जुलाब, असहिष्णुता, आतड्यांची संवेदनशीलता किंवा इरिटेबल बाऊल सिंड्रोमसारख्या वाढून पोटाचे आरोग्य बिघाडू शकते. वारंवार पोट फुगणे किंवा अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. पोटात गॅस साचून राहिल्यानंतर ढेकरा किंवा वायू सुटणे, पोट भरल्यासारखे वाटणे, भूक कमी होणे आणि कपडे पोटाजवळ घट्ट झाल्यासारखे वाटू लागतात. जेवल्यानंतर लगेच पोट जड झाल्यासारखे वाटत असेल तर रोजच्या आहारात बदल करणे फार आवश्यक आहे.
जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष
जेवताना घाई न करणे, अन्न नीट चावून खाणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे, जंक फूडचे कमीत कमी प्रमाणात सेवन करणे फार आवश्यक आहे. आहारात खालेल्या कोणत्या पदार्थामुळे वांरवांर ब्लोटिंग होत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोट फुगण्यासोबत सतत पोटदुखी, वारंवार उलट्या, रक्तमिश्रित शौच, कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे, सतत जुलाब किंवा कब्ज, शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल झाल्यास डॉक्टरांचा सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.
Ans: गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, काही पदार्थांचे असहिष्णुता किंवा पचनसंस्थेशी संबंधित इतर कारणांमुळे पोट सतत फुगल्यासारखे वाटू शकते.
Ans: होय. अपचनामुळे पोटात गॅस, जडपणा, ढेकर आणि पोट फुगल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: तीव्र किंवा सतत पोटदुखी, वारंवार उलट्या, शौचाच्या सवयींमध्ये मोठा बदल, मलामध्ये रक्त, कारण नसताना वजन कमी होणे किंवा सतत भूक न लागणे यांसारखी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.






