कोथिंबिरीच्या बियांचे पाणी प्यायल्यास आरोग्याला होणारे फायदे
जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबीर पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्याचे काम करते. कोथिंबिरीच्या पानांसोबतच धणे सुद्धा जेवणात वापरले जाते. बाजारात धणा पावडर सहज उपलब्ध होते. धणे पावडरचा वापर भाजी, सूप किंवा मसाला बनवताना केला जातो. पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर धण्याचे पाणी पिण्यास दिले जाते.यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला धण्याच्या बियांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
सकाळी उठल्यानंतर रोज रिकाम्या पोटी धण्याचे पाणी प्यायल्यास बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात धणे भिजत ठेवावे. रात्रभर धणे भिजल्यानंतर सकाळी उठल्यावर धणे गाळून धण्याचे पाणी प्यावे. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या काम होतात.गॅस, सूज आणि अपचन या समस्यांपासून आराम मिळतो.
हे देखील वाचा: प्रोटीनच्या कमतरतेमुळे आरोग्य बिघडलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण अनेकदा वजन कमी होत नाही. अशावेळी तुम्ही धण्याचे पाणी पिऊ शकता. हे पाणी नियमित प्यायल्यास पोटावरील चरबी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल.
शरीरातील नसांमध्ये वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी रोजच्या आहारात धण्याचे पाणी प्यावे. या पाण्यात आढळून येणाऱ्या घटकांमुळे शरीरातील घाण कमी होऊन आरोग्य सुधारते.
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर थायरॉईडची समस्या दिसून येतो. शरीरात थायरॉईड वाढल्यानंतर मासिक पाळीमध्ये अडथळा निर्माण होणे, मान किंवा घसा सुजणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. अनेकदा थायरॉईड झाल्यानंतर वजन वाढू लागते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोथिंबिरीच्या बियांचे पाणी प्यावे.
हे देखील वाचा: सकाळची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने, सोप्या पद्धतीमध्ये बनवा पनीर पॅनकेक
पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी बारीक करून घेतलेले धणे टाकून घ्या.
त्यानंतर त्यात कोमट पाणी टाकून रात्रभर धणे पाण्यात भिजत ठेवा.
भिजत ठेवलेल्या कोथिंबिरीच्या बियांचे पाणी सकाळी उठल्यानंतर प्या. यामुळे तुमची बिघडलेली पचनक्रिया सुधारेल.