Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी नसताना सुद्धा अतिरक्तस्त्राव होतो? महिलांना ‘या’ आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात गंभीर लक्षणे

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे काहीवेळा असामान्य रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. रक्तस्त्राव वाढू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 12:45 PM
मासिक पाळी नसताना सुद्धा अतिरक्तस्त्राव होतो? महिलांना 'या' आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात गंभीर लक्षणे

मासिक पाळी नसताना सुद्धा अतिरक्तस्त्राव होतो? महिलांना 'या' आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
अतिरक्तस्त्राव होण्याची कारणे आणि त्यामागील आजार?
वाढत्या वयात महिलांना कोणत्या आजाराची लागण होते?

सर्वच महिलांनी स्वतःची आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कौटूंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढलेला तणाव, मुलांची जबाबदारी, शारीरिक आणि मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे खूप जास्त दुर्लक्ष करतात. वय वाढल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. पण घरातील कामांमधून आराम करण्यास वेळ मिळत नाही. असे न करता शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना रक्तस्त्राव होतो. पण काहीवेळा मासिक पाळी व्यतिरिक्त होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष केले जाते. पण या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी जीवघेणे ठरू शकते. वयाच्या ४० व्या वर्षानंतर शरीराला कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

व्य वाढल्यानंतर वेळोवेळी योग्य त्या रक्त तपासण्या करून घेणे फार आवश्यक आहे. महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे गंभीर आजाराची लागण होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जीव सुद्धा गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी व्यतिरिक्त कोणत्या कारणांमुळे अतिरक्तस्त्राव होण्याची शक्यता असते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि खूप जास्त थकवा वाढू लागतो. रक्त कमी झाल्यानंतर वाढलेला थकवा काही केल्या लवकर कमी होत नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

असामान्य रक्तस्त्राव म्हणजे काय?

दोन पाळींच्या दरम्यान होणारा रक्तस्त्राव, लैंगिक संबंधानंतर होणारा जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव ही स्थिती असामान्य रक्तस्त्राव मानली जाते. तर काहीवेळा गर्भधारणेदरम्यान कमी-अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होतो. मात्र हा स्त्राव काहीवेळा हलक्या डागांच्या स्वरूपात असतो तर कधी कधी खूप जास्त प्रमाणात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार तुम्हाला रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच तपासण्या करून शरीराची काळजी घ्यावी.

मासिक पाळीवर हार्मोनल बदलांचा कसा परिणाम होतो:

वय वाढल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात. हे बदल काहीवेळा अतिशय सामान्य असतात तर काहीवेळा अतिशय गंभीर सुद्धा असतात. शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स मासिक पाळी नियंत्रणात करते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम होतो आणि रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे काहीवेळा अधून मधून रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

गर्भाशयात तयार होणाऱ्या कर्करोग नसलेल्या फायब्रॉइड्स गाठी वाढल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पोटात वेदना आणि रक्तस्त्राव होतो. पॉलिप्स गर्भाशयात किंवा गर्भाशयग्रीवेतील लहान गाठी आहेत. या गाठी वाढल्यानंतर कधीकधी रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक हार्मोनल समस्या आहे. यामुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात. ज्याच्या परिणामामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळी नसतानाही रक्तस्त्राव का होऊ शकतो?

    Ans: हार्मोनल असंतुलन, गर्भाशयातील फायब्रॉईड्स, पॉलिप्स, PCOS, एंडोमेट्रिओसिस, थायरॉईड विकार किंवा काही संसर्ग यांमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.

  • Que: PCOS मुळे अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो का?

    Ans: होय. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि मधूनमधून रक्तस्त्राव दिसू शकतो.

  • Que: हार्मोनल असंतुलनामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो का?

    Ans: होय. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समधील असंतुलनामुळे मासिक पाळीचे चक्र बिघडून असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो.

Web Title: Heavy bleeding even without menstruation serious symptoms appear after women are infected with these diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • Cervical Cancer

संबंधित बातम्या

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
1

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.