खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात 'या' सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल
तोंडात फोड येण्याची कारणे?
तोंडात अल्सर येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी उपाय?
धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाल, पोषक घटकांची कमतरता आणि बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पोटात वाढलेली जळजळ, बिघडलेली पचनक्रिया आणि तोंडात लालसर फोड इत्यादी लक्षणे उष्णता वाढल्यानंतर दिसून येतात. तोंडात आलेले वेदनादायी फोड खाण्यापिण्याचे वांदे करून टाकतात. याला माऊथ अल्सर सुद्धा म्हंटले जाते. हे केवळ तोंडातच नाहीतर आतड्यांमध्ये सुद्धा येण्याची जास्त शक्यता असते. तोंडात झालेल्या जखमांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
तोंडात आलेल्या अल्सरमुळे खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. वेदनादायी अल्सर अगदी पाणी पिताना सुद्धा खूप जास्त झोंबतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते आणि आतड्यांमध्ये विषारी घटक साचून राहतात. हेच विषारी घटक दीर्घकाळ शरीरात जमा होऊन राहिल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवण्यासोबतच तोंडात अल्सरचे फोड येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंडात अल्सर कशामुळे येतात? अल्सर किंवा लालसर फोड येऊ नये म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Kidney Disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका
अपचनाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या महिला पुरुषांमध्ये तोंडात फोड येणे किंवा अल्सर इत्यादी समस्या प्रामुख्याने दिसू लागतात. त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांसोबतच फळे आणि दुधाचा समावेश करावा. जेवणात फार तिखट किंवा तेलकट अन्नपदार्थ खाऊ नये. विटामिन बी १२, फोलेट, लोह कमी झाल्यानंतर तोंडात मोठ्या प्रमाणावर अल्सर येतात. हे अल्सर बरे करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. माऊथ अल्सरमुळे खूप जास्त त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: तोंडातील फोड अनेक कारणांमुळे येऊ शकतात. पोषणाची कमतरता, तणाव, तिखट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप किंवा तोंडाला झालेली इजा ही काही सामान्य कारणे आहेत.
Ans: अनियमित आहार, कमी पाणी पिणे, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, जास्त तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे फोडांची समस्या वाढू शकते.
Ans: बहुतेक सामान्य फोड 7 ते 14 दिवसांत बरे होतात. मात्र वारंवार किंवा दीर्घकाळ राहणाऱ्या फोडांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






