Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एड्सपेक्षाही धोकादायक ठरतोय हेपेटायटिस आजार, कसे ओळखाल संकेत

Hepatitis Warning Signs: हेपेटायटीस नावाचा आजार तुमच्या शरीरावर सध्या मोठ्या प्रमाणात हल्ला करत असल्याचे आढळून आले आहे. एड्सच्या आजारापेक्षाही अधिक भयानक असणाऱ्या या आजाराची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण धोका वाढला तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 02, 2024 | 10:27 AM
हेपेटायटिसची लक्षणे ओळखा

हेपेटायटिसची लक्षणे ओळखा

Follow Us
Close
Follow Us:

हेपेटायटिस हा एक असा आजार आहे ज्याबद्दल सामान्यतः फारसे बोलले जात नाही, परंतु जर यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर तो एड्सपेक्षाही जास्त घातक ठरू शकतो, कारण त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. 

वास्तविक, हेपेटायटिसही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये लिव्हरची जळजळ लक्षणीयरीत्या वाढते आणि यामध्ये विषाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 354 दशलक्ष लोकांना याचा फटका बसला आहे. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

हेपेटायटिसचे प्रकार आणि कसा पसरतो?

  1. हेपेटायटिस ए (Hepatitis A) – दूषित पाणी आणि जेवणातून हा आजार पसरतो
  2. हेपेटायटिस बी (Hepatitis B) – संक्रमित शरीराच्या फ्लुईडमार्फत पसरतो
  3. हेपेटायटिस सी (Hepatitis C) – हेपेटायटिस बी प्रमाणेच फ्लुईडमार्फत पसरतो
  4. हेपेटायटिस डी (Hepatitis D) – संक्रमित रक्ताच्या संपर्कात येण्याने पसरतो
  5. हेपेटायटिस ई (Hepatitis E) – दूषित पाण्यासह अन्नातून पसरणारा आजार
हेदेखील वाचा –  गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक

हेपेटायटिसची लक्षणे (Hepatitis Symptoms)

हेपेटायटिसचे संकेत

  • त्वचा पिवळसर होणे
  • डोळे पिवळे होणे
  • नखांचा रंग पिवळा होतो
  • थकवा
  • फ्लू सारखी लक्षणे
  • गडद पिवळी लघ्वी 
  • गडद पिवळे स्टूल
  • पोटदुखी
  • भूक न लागणे
  • अचानक वजन कमी होणे

हेपेटायटिस कसे टाळावे?

हेपेटायटिसचे धोके खूप गंभीर असू शकतात, त्यामुळे ते टाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. हा धोकादायक आजार कसा टाळायचा ते जाणून घेऊया. यासाठी काही ठराविक गोष्टी केल्यास आजार टळू शकतो. 

हेदेखील वाचा – World Hepatitis Day 2024 : का साजरा केला जातो हिपॅटायटीस दिन? जाणून घ्या यामागचा इतिहास

लसीकरण करा

हेपेटायटिससाठी लसीकरण करणे महत्त्वाचे

हेपेटायटिस टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या लसी लहान वय असतानाच घेणे. असे केल्याने, हेपेटायटिसचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. असे असले तरीही अजूनपर्यंत हेपेटायटिस सी आणि ई च्या लसींचा शोध लागलेला नाही.

व्हायरसचा संपर्क टाळा

हेपेटायटिस विषाणूचा संसर्ग जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील द्रव दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो तेव्हा पसरतो. म्हणून, ज्यांना हा आजार आहे त्यांच्याशी अंतर्गत संपर्क टाळावा. यामध्ये रेझर शेअर करणे, सुया वाटणे, दुसऱ्याचा टूथब्रश वापरणे, दुसऱ्याच्या रक्ताला स्पर्श करणे आणि असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे यांचा समावेश होतो. तुम्हीही असे करत असाल तर त्यांच्यापासून ताबडतोब दूर राहा.

दूषित पाणी आणि अन्न टाळा

पाण्यातील दूषितपणा ठरतो कारणीभूत

नेहमी घरातील स्वच्छ पाणी आणि अन्नाचे सेवन करा. अनेकदा लोक बाहेरच्या गोष्टी खाऊन हेपेटायटिसचे बळी होतात, मग निरोगी व्हायला खूप वेळ लागतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात अधिक आजार पसरतात अशावेळी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. स्वतःला जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Hepatitis symptoms types causes and prevention disease affect bigger than aids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 10:02 AM

Topics:  

  • Health Tips
  • hepatitis

संबंधित बातम्या

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण
1

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
2

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…
3

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
4

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.