Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमुळे भारतात वाढतंय हृद्यासंबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ, ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

एलडीएलसी नियंत्रणात ठेवणे ही आयुष्यभराची कटिबद्धता आहे. नियमित कोलेस्‍ट्रॉल तपासणी, वेळेवर औषधे घेणे आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2025 | 12:45 PM
उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमुळे भारतात वाढतंय हृद्यासंबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ

उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमुळे भारतात वाढतंय हृद्यासंबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ

Follow Us
Close
Follow Us:

चुकीचा आहार, शरीरात सतत होणारे बदल, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे छोटे मोठे बदल काहीवेळा आरोग्य धोक्यात आणतात. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवास्ट्रोक येण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

वाढत्या उष्णतेमुळे पोटात सतत आग होते? आहारात ‘या’ पदार्थांचे चुकूनही करू नका सेवन, वाढतील पोटासंबंधित समस्या

भारतात परिस्थिती बदलत आहे, जेथे असंसर्गजन्य आजार प्राथमिक आरोग्‍य धोका म्‍हणून उदयास येत आहेत, तर संसर्गजन्य आजार अजूनही चिंतेचा विषय आहेत. या संकटाच्या अग्रस्‍थानी हृदयसंबंधित आजार आहेत. संशोधनांमधून निदर्शनास आले आहे की, भारतातील 7.8 टक्‍के मृत्यूंसाठी उच्‍च कोलेस्ट्रॉल कारणीभूत आहे. आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य प्रयत्‍नांमधील प्रगतीमुळे हृदयसंबंधित आजारांचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली आहे, असे असले तरी जागरूकता वाढवल्याने या प्रयत्‍नांमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते.

उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल धोकादायक ठरू शकते

पाश्चिमात्‍य देशांच्‍या तुलनेत भारतीयांना 10 ते 15 वर्षे अगोदर हृदयसंबंधित आजार होतात. हृदयसंबंधित आजारांचे मुख्‍य कारण म्‍हणजे उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल (एलडीएलसी). एलडीएल कोलेस्‍ट्रॉल ‘सायलेण्‍ट किलर’ आहे, ज्‍यामध्‍ये लक्षणे दिसून येत नाहीत, हळूहळू रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये फॅट जमा होते. फॅट्सचे प्रमाण वाढत जाण्‍यासह रक्‍तप्रवाहाला अडथळा होऊ शकतो किंवा रक्‍तवाहिन्‍या फुटू शकतात, परिणामत: प्रकृती गंभीर होऊ शकते.

एलडीएलसी हा कोलेस्‍ट्रॉलचा प्रकार आहे, जो शरीराच्या विविध पेशींमध्ये फॅट्स वाहून नेण्यासाठी जबाबदार असतो. पण, एलडीएलसीची पातळी वाढते तेव्हा तो सर्वात धोकादायक कोलेस्‍ट्रॉल असतो, याच कारणामुळे हा ‘बॅड कोलेस्‍ट्रॉल’ म्हणून ओळखला जातो. एलडीएलसीची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे, त्यांचे प्रमाण वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे आणि संतुलन राखले पाहिजे.

एलडीएल कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनासाठी वैयक्तिकृत लक्ष्‍य

एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात त्‍यांची चाचणी करणे आवश्‍यक आहे. कार्डियोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) वयाच्‍या 18 वर्षांपासून लिपिड प्रोफाइल तपासणीची शिफारस करते. लवकर तपासणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्‍यांचे निदान होण्‍यास मदत होते. आरोग्‍यदायी दिसणाऱ्या व्‍यक्‍तींमध्ये देखील एलडीएलसीचे प्रमाण जास्त असू शकते, म्हणून नियमित चाचणी करणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, ”एलडीएल कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन करणे म्हणजे केवळ लक्ष्यित संख्या गाठणे एवढेच नाही. प्रत्येक व्यक्‍तीचे वेगळे जोखीम घटक असतात, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली निवडी, लठ्ठपणासारख्या पूर्व-अस्तित्वातील स्थिती इत्यादींचा समावेश असतो. हे घटक कोलेस्ट्रॉल लक्ष्यांवर आणि उपचार पद्धतींवर प्रभाव पाडतात, ज्यामुळे वैयक्तिक व्यवस्थापन आवश्यक असते. नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या कालांतराने नकळतपणे वाढतात. लवकर हस्तक्षेप केल्याने प्लाक जमा होणे किंवा रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळा येणे यांसारख्या गुंतागूंत टाळता येतात. निर्धारित उपचार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्याने दीर्घकालीन संरक्षण मिळते. माझे 10-15 टक्‍के रुग्ण त्यांच्या उपचारांचे काटेकोरपणे पालन करतात आणि वेळेवर स्‍वत:ची तपासणी करतात. आज कोलेस्ट्रॉल पातळीकडे दुर्लक्ष केल्याने अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतात. जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय मार्गदर्शनासह नियमित चाचणी हा हृदयाचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.”

भारतीयांना जास्त धोका आहे का?

भारतीयांना जास्त धोका आहे, कारण त्यांच्यामध्‍ये लहान, दाट एलडीएल कण असतात. मोठ्या एलडीएल कणांपेक्षा वेगळे हे लहान कण सहजपणे रक्‍तवाहिन्‍यांच्‍या भित्तिकेमध्‍ये प्रवेश करू शकतात, जेथे ते ऑक्सिडेशनमधून जातात आणि सूज (जळजळ) निर्माण करतात. यामुळे फॅट्स जमा होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयसंबधित आजार, स्ट्रोक आणि हार्ट फेलुअरचा धोका वाढतो.

‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नका कलिंगडचे सेवन! पोटातील आतड्यांमध्ये तयार होईल विष, वाढेल इन्फेक्शनचा धोका

तुमच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍या

सक्रिय जीवनशैली आणि आरोग्‍यदायी आहार सेवन करणे महत्त्वाचे असले तरी काही केसेसमध्‍ये उच्‍च एलडीएलसी पातळ्या व्यवस्थापित करण्यासाठी केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे नसते. उच्‍च एलडीएलसी असलेल्या व्यक्तींसाठी, औषधोपचार अनेकदा आवश्यक असतो. रुग्णांनी डॉक्टरांकडे जाणे, निर्धारित उपचारांचे पालन करणे आणि लक्ष्ये पूर्ण झाल्यावरही प्रिस्क्रिप्शनचे पालन करणे महत्वाचे आहे. लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की एलडीएलसीवरील उपचार आजीवन कटिबद्धता आहे, अल्‍पकालीन लक्ष्‍य नाही.

 

Web Title: High ldl cholesterol is leading to an increase in the incidence of heart diseases in india take care of your health like this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • cholesterol symptoms

संबंधित बातम्या

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल
1

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल

Cholesterol Remedies: शरीरातून खेचून काढेल कोलेस्ट्रॉल, विरघळून निघेल पिवळा कचरा; 10 पदार्थांचा करा समावेश
2

Cholesterol Remedies: शरीरातून खेचून काढेल कोलेस्ट्रॉल, विरघळून निघेल पिवळा कचरा; 10 पदार्थांचा करा समावेश

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, सर्वच शिरांमधून वाहील ऑक्सिजन
3

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, सर्वच शिरांमधून वाहील ऑक्सिजन

नसांमध्ये चिकटलेली चरबी पिरगळून काढेल ‘हे’ एक ड्रिंक, कोलेस्ट्रॉलसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिला सल्ला
4

नसांमध्ये चिकटलेली चरबी पिरगळून काढेल ‘हे’ एक ड्रिंक, कोलेस्ट्रॉलसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.