आहारात 'या' पदार्थांचे चुकूनही करू नका सेवन
राज्यासह देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे अंगातून सतत घामाच्या धारा निघतात. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर जास्त पाण्याचे सेवन करावे. पाणी भरपूर प्याल्यामुळे शरीरात ओलावा कायम टिकून राहतो. उन्हाळा वाढल्यानंतर आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण अतितिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. याशिवाय पचनसंबंधित समस्या वाढून आरोग्याला हानी पोहचते. चुकीचा आहार, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता, व्यायामाचा अभाव, कामाचा वाढलेला स्ट्रेस इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे काहीवेळा शरीरात अनेक बदल होऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना थंड पदार्थ खाण्यास खूप आवडतात. मात्र वारंवार थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी फ्रिजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ पुन्हा एकदा गरम करून खातात. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळा वाढल्यानंतर आहारात पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मात्र तरीसुद्धा अनेक लोक आहारात तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ खातात. तळलेल्या तिखट आणि तेलकट पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढून पोटात आग होणे, छातीमध्ये जळजळ होणे किंवा वेदना इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. कारण या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि ओलावा कायम टिकून राहण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात. थंड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनावर परिणाम होण्याची शक्यता असते. उष्णता वाढलेल्या शरीरात जास्त थंड पदार्थ गेल्यानंतर शरीराचे तापमान असंतुलित होऊन जाते, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स, सर्दी-खोकला होण्याची जास्त शक्यता असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या चाट किंवा फळांच्या पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाहेर मिळणाऱ्या चटयुक्त पदार्थांमध्ये धूळ, उष्णता आणि स्वच्छतेचा अभाव, बॅक्टरीया इत्यादी वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे उन्हाळ्यात बाजारात मिळनाराय चाटचे सेवन करू नये.