जाणून घ्या जागतिक मेंदू दिवसाचा इतिहास
दरवर्षी जगभरात सगळीकडे 22 जुलै ला जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे काही उद्दिष्ट्य आहेत.धावपळीच्या जीवनात अनेक लोक आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. अनेकदा मेंदू संबंधित आजार उद्भवतात. या आजारांची लक्षणे लवकर दिसून येत नाही. हळूहळू लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन 22 जुलै ला जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. मेंदूसंबंधित आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील सर्वच देशांमध्ये 22 जुलै ला जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. मेंदू हा शरीरातील प्रमुख अवयव आहे. मेंदू शरीरातील महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. आज आम्ही तुम्हाला जागतिक मेंदू दिवस का साजरा केला जातो? जागतिक मेंदू दिवसाची सुरुवात नेमकी कुठून झाली? चला तर जाऊन घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीकडून सगळ्यात आधी मेंदू दिवस साजरा करण्यात आला होता. 2014 मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. WFN ची स्थापना 22 जुलै 1957 रोजी बेल्जियममध्ये झाली होती. मेंदूचे आरोग्य आणि न्यूरोलॉजी संशोधनासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेमध्ये जगभरातील अनेक मेंदूचे डॉक्टर सहभागी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये सगळ्यात आधी जागतिक मेंदू दिवस साजरा करण्यात आला होता.
हे देखील वाचा: मोबाईल वापरताना डोळ्यांपासून किती दूर ठेवावे? जाणून घ्या
जाणून घ्या जागतिक मेंदू दिवसाचा इतिहास
जागतिक मेंदू दिवस साजरा करण्यामागे काही खास उद्देश आहे. मेंदूचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरातील संपूर्ण अवयवांचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मेंदूच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आणि मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. मेंदूच्या आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
दरवर्षी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. या दिवसाची दरवर्षी थीम ठरवली जाते. यंदाच्या थीम “मेंदूचे आरोग्य आणि प्रतिबंध” अशी आहे.