Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: बाजारातील रासायनिक रंग विसरा! नैसर्गिक पदार्थांपासून घरीच तयार करा 100% ऑर्गेनिक कलर्स

Natural Colors: होळी हा रंगांचा सण असला तरी बाजारात मिळणारे रसायनयुक्त रंग आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. अशात तुम्ही घरीच नैसर्गिक पद्धतीने नॅचरल कलर्स तयार करू शकता, कसे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2025 | 01:28 PM
Holi 2025: बाजारातील रासायनिक रंग विसरा! नैसर्गिक पदार्थांपासून घरीच तयार करा 100% ऑर्गेनिक कलर्स

Holi 2025: बाजारातील रासायनिक रंग विसरा! नैसर्गिक पदार्थांपासून घरीच तयार करा 100% ऑर्गेनिक कलर्स

Follow Us
Close
Follow Us:

होळी हा सण आता जवळ आला आहे, हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. रंगानी सजलेला हा सण आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. आजकाल अधिकतर लोक सणानिमित्त बाजारातून रसायनयुक्त रंग खरेदी करत असतात मात्र हे रंग आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फार हानिकारक ठरत असतात. यातील रासायनिक घटकांमुळे त्वचेवर खाज, जळजळ आणि ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त रंगांमध्ये शिसे, पारा, सिलिका आणि इतर हानिकारक रसायने मिसळले जातात. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि ऍलर्जी होऊ शकते.

काही रंग तर इतके विषारी असतात की त्यामुळे डोळ्यांची जळजळ होते आणि केस गळतात. अशात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे रंग घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. घरी बनवलेल्या हर्बल कलर्सने तुम्ही तुमची होळी आणखीन मजेदार आणि सुरक्षित बनवू शकता. असे करून तुम्ही स्वतःचा, इतरांचा तसेच पर्यावरणाचाही फायदा करू शकता. मुख्य म्हणजे यात तुमचे कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च होणार नाही, तुम्ही अगदी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांपासूनच हे रंग तयार करू शकता. चला तर मग हे रंग घरी कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते ‘होळी’

गुलाबी किंवा लाल रंग

बीटाचा लाल चटकेदार रंग तुम्हाला रंग बनवण्यासाठी कामी येऊ शकतो. यासाठी बीटरूटचे छोटे तुकडे करून उन्हात वाळवा. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची बारीक पावडर बनवा. आता त्यात ॲरोरूट पावडर टाका म्हणजे रंग मऊ होईल.

हिरवा रंग

हिरवा रंग तयार करण्यासाठी आपण पालकचा वापर करू शकतो. यासाठी ताजी पालक वाळवून त्याची पावडर बनवा. त्यात ॲरोरूट समान प्रमाणात मिसळून मऊ गुलाल तयार करा. यासाठी मेहंदी पावडर देखील वापरली जाऊ शकते, परंतु हे लक्षात ठेवा की ते नैसर्गिक असावे.

मुंबईच्या लोकांना काय कळणार कोकणातील शिमग्याची मजा! पालखीचा नाद अन् शंकासुराची भिती, अनोखा असतो उत्सवाचा थाट

पिवळा रंग

तुम्हाला माहिती आहे का? हळद पावडरमध्ये बेसन मिसळून पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

निळा रंग

निळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही गुलमोहराच्या निळ्या फुलांचा वापर करू शकता. यासाठी फुले वाळवून त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवा. मग त्यात ॲरोरूट टाकून सुरक्षित रंग तयार करा.

नैसर्गिक रंगांचा फायदा

  • नैसर्गिक रंगांच्या वापराने हानिकारक रसायनांपासून त्वचा आणि केसांचे संरक्षण होते
  • नैसर्गिक रांगांमध्ये कोणतेही विषारी पदार्थ नसतात, ज्यामुळे निसर्गाचे संरक्षण होते
  • लहान मुले आणि वृद्धांसाठी देखील सुरक्षित

Web Title: Holi 2025 forget the chemical colors make 100 percent organic colors at home from natural ingredients lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • holi
  • Holi 2025
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं
1

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
2

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

गॅसवरील घाण, चिवट तेलाचे डाग निघता निघत नाहीत? मग आजच 10 मिनिटांचा हा उपाय करा अन् मिळवा नव्यासारखी चमक
3

गॅसवरील घाण, चिवट तेलाचे डाग निघता निघत नाहीत? मग आजच 10 मिनिटांचा हा उपाय करा अन् मिळवा नव्यासारखी चमक

या 5 सवयींमुळे देवी लक्ष्मी होते नाराज, चुकूनही या चुका करू नका नाहीतर कधीही ठेवणार नाही घरात पाऊल
4

या 5 सवयींमुळे देवी लक्ष्मी होते नाराज, चुकूनही या चुका करू नका नाहीतर कधीही ठेवणार नाही घरात पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.