
केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा 'या' पद्धतीने करा वापर
रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात
बदलेले वातावरण, धूळ, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केस मऊ आणि मुलायम करण्यासाठी पिकलेल्या केळ्याचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केळीमध्ये असलेले पोटॅशियम केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय केसांच्या निरोगी वाढीसाठी कायमच घरगुती उपाय करावे. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहते.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, मध्यम आकाराचे पिकलेलं केळ घेऊन त्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करून घ्या. चमच्याने केळी व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि मध मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावा. यामुळे केस मऊ आणि मुलायम होण्यासमदत होईल. हेअर मास्क एक तासांपेक्षा जास्त वेळ ठेवल्यानंतर शँम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची शाईन वाढेल आणि केस सुंदर चमकदार दिसू लागतील.