गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय:
सर्वच महिला त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. त्वचा सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट, प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. मात्र ओठांच्या आरोग्याकडे फार कमी लक्ष दिले जाते. सतत लिपस्टिक किंवा इतर कोणतेही प्रॉडक्ट लावल्यामुळे ओठ कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. ओठ कोरडे आणि निस्तेज झाल्यानंतर ओठ काळे पडतात. लिप्स्टीकमध्ये असलेले हानिकारक केमिकल ओठ खराब करून टाकतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. (फोटो सौजन्य – iStock)
ओठांची त्वचा खराब आणि कोरडी झाल्यानंतर ओठांवर लिपस्टिक देखील व्यवस्थित बसत नाही. याशिवाय ओठ खराब होण्यामागे अनेक कारण सुद्धा आहेत. चुकीची जीवनशैली, आहारत सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान, शरीरात निर्माण झालेला थकवा इत्यादी अनेक कारणांमुळे ओठ काळवंडून जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळे झालेले ओठ पुन्हा एकदा गुलाबी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास ओठ सुंदर आणि चमकदार दिसतील.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. नारळाच्या तेलात असलेले गुणधर्म ओठांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतील. याशिवाय डेड स्किन निघून जाईल. वाटीमध्ये नारळाचे तेल घेऊन त्यात साखर मिक्स करून ओठांवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने ओठांवर मसाज करा. ओठांवर लावलेला स्क्रब ५ मिनिटं ठेवून नंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास तुमचे काळे झालेले ओठ पुन्हा एकदा गुलाबी होऊन सुंदर आणि चमकदार दिसतील.
ओठांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक ओठ गुलाबी आणि मऊ करण्यासाठी मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून ओठांवर लावा. त्यानंतर पाण्याने ओठ धुवून घ्या. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी इत्यादी घटक आढळून येतात, जे ओठ गुलाबी आणि मॉइश्चरायझ करतात.
‘हा’ आजार फार भयंकर! शरीरातून घाम नाही तर वाहते चक्क रक्ताची धार
मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेचे रंग उजळतो. याशिवाय लिंबामधील विटामिन सी त्वचा उजळदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ओठांची सुंदर आणि चमकदार होईल.