Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दातांना कधीही नाही लागणार किड, ना येणार घाण वास… आचार्यांनी सांगितला घरगुती मंजनचा उपाय; फक्त 3 साहित्यांची गरज

Dental Health Tips : अनेकदा आरोग्याची राखताना दातांकडे आपले दुर्लक्ष होते ज्यामुळे तोंडातून घाण वास येऊ लागतो किंवा दातांमध्ये किड तयार होते. अनेकदा टूथपेस्ट वापरुनही या समस्या निर्माण होतात ज्यामुळे आयुर्वेदिक उपायांकडे वळणे फायद्याचे ठरु शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 08:15 PM
दातांना कधीही नाही लागणार किड, ना येणार घाण वास... आचार्यांनी सांगितला घरगुती मंजनचा उपाय; फक्त 3 साहित्यांची गरज

दातांना कधीही नाही लागणार किड, ना येणार घाण वास... आचार्यांनी सांगितला घरगुती मंजनचा उपाय; फक्त 3 साहित्यांची गरज

Follow Us
Follow Us:
  • तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात.
  • काही नैसर्गिक घरगुती उपाय तोंडाची स्वच्छता आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
  • जुन्या आयुर्वेदिक पद्धती आजही दातांच्या निगेसाठी प्रभावी मानल्या जातात.
अनेकदा शरीराची, त्वचेची काळजी अधिक घेतली जाते पण तोंडाच्या स्वच्छतेकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. इतर गोष्टींप्रमाणेच तोंडाच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्यायला हवे अन्यथा दातांना किड लागणे किंवा तोंडातून दुर्घंध वास येणे अशा समस्या उद्भवू लागतात. चारचाैघात बोलताना जर आपल्या तोंडातून घाण वास येत असेल तर ही बाब आपल्यासाठी लाजिरवाणी ठरु शकते. बऱ्याचदा रोज दात घासूनही या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे यावर एक आयुर्वेदिक, रामबाण आणि घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जुन्या काळात टूथब्रश किंवा टूथपेस्ट नव्हते पण तरीही लोकांचे दात पांढरेशुभ्र आणि स्वच्छ असायचे. असे का, तर त्यावेळी नॅचरल आयुर्वेदिक मंजनचा वापर केला जात होता. आयुर्वेदिक तज्ञ आचार्य मनीष यांनी आपले दात साफ करण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी एक सोपा आणि घरगुती उपाय आपल्यासोबत शेअर केला आहे. या उपायाच्या मदतीने तुम्ही घरीच कोणतेही पैसे खर्च न करता तुमच्या दातांचे आरोग्य सुधारु शकता. यामुळे दातांना किड लागण्याचीही भिती दूर होते.

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

घरगुती दंतमंजन

आचार्य मनीष यांनी सांगितले की, टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरिल सल्फेटचे (SLS) प्रमाण आढळते ज्यामुळे फेस तयार होतो. यात काही असे घटक असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तुम्ही वर्षानुवर्षांपासून टूथपेस्टचा वापर करत आहात पण तरीही जर तुमचे दात क्लिन राहत नसतील तर तुम्ही घरीच प्रभावी मंजन तयार करु शकता. पूर्वाच्या काळी याच मंजनाचा वापर करुन लोकांचे दात शुभ्र पांढरे आणि मजबूत राहत होते. ते म्हणतात ना, काही गोष्टी जुन्याच चांगल्या असतात.

तीन गोष्टींचा वापर करा

जर तुमच्या दातांमध्ये किड लागली असेल किंवा नसेलही लागली तरी तुम्ही या दंतमंजनचा वापर करु शकता. दंतमंजन तयार करण्यासाठी अर्धा चमचे हळद, काळं मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करुन पेस्ट तयार करा. या पेस्टला रोज रात्री आणि सकाळी आपल्या दातांवर घासा. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे बंद होईल, दात स्वच्छ होतील आणि दातांना किड लागली असेल तर ती निघून जाईल.

तोंडाच्या दुर्गंधी पासून सुटका

जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर दिवसातून ३-४ वेळा जेष्ठमध आणि वेलची चावा. यामुळे तोंडातील घाण वास दूर होण्यास मदत होईल. याचबरोबर यामुळे दातांमध्ये किड लागण्याची भितीही कमी होते. यामुळे फक्त दातच नाही तर घसा देखील साफ होतो.

Travel News : खर्च कमी, आनंद दुप्पट! हनिमूनसाठी परफेक्ट आहेत भारतातील ही ठिकाणे

दातांच्या वेदनेला करा दूर

जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असतील आणि या वेदना असहाय्य झाल्या असतील तर हा उपाय तुमच्या कामी येईल. यासाठी कोवळ्या पेरुच्या पानांचा वापर करा आणि त्यांना दातांमध्ये ठेवून चघळत राहा. या पानांमध्ये नैसर्गिक वेदनाशामक आणि जीवाणूनाशक गुणधर्म असतात जे वेदनेला कमी करण्यास मदत करतात. तुम्ही या पानांचा काढा तयार करुनही पिऊ शकता. या काढ्याने गुळण्या करा ज्यामुळे याचा रस दुखऱ्या भागांपर्यंत पोहचेल. यामुळे हिरड्यांमधील सूज कमी होण्यासही मदत मिळते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies make natural chemical free toothpaste for healthy teeth and fresh breath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • teeth home remedies

संबंधित बातम्या

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
1

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
2

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
3

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट
4

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.