
नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला बाजारातील महागड्या उत्पादनाचा वापर करतात. पण यामुळे त्वचा आणखीन खराब होत जाते. पिंपल्स येणे, नाकावर ब्लॅकहेड, व्हाईटहेड येणे, मुरूम किंवा फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पण नाकावर आलेल्या व्हाईटहेडमुळे त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते. त्वचा निस्तेज झाल्यानंतर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होत जातो. तसेच नाकावर आलेले व्हाईटहेड निघून गेल्यानंतर त्याचे डाग तसेच राहून जातात. त्यामुळे नाकावर निशाणा येतात. निशाणा आल्यानंतर ते घालवण्यासाठी पुन्हा एकदा वेगळ्या क्रीम लावाव्या लागतात. त्यामुळे नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला नाकावरील व्हाईटहेड घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो, याबद्दल सांगणार आहोत. ( फोटो सौजन्य-istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात मीठ हा पदार्थ असतो. जेवणाची चव मीठामुळे वाढते. नाकावरील व्हाईटहेड काढण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा कोरफड जेल घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण नाकावरील व्हाईटहेड ला लावा, हलक्या हाताने स्क्रब करून व्हाईटहेड हातांच्या सहाय्य्यने काढा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे नाकावरील पोर्स उघडे होऊन त्वचेमधील घाण, व्हाईटहेड निघून स्वच्छ होतील.
कॉफी स्क्रबच्या सहाय्याने तुम्ही नाकावरील व्हाईटहेड्स काढू शकता. यासाठी एकदा वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात थोडीसे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण नाकाला लावून हलक्या हाताने चोळा.यामुळे व्हाईटहेड पूर्णपणे निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल. जास्त प्रमाणात व्हाईटहेड असल्यास आठवड्यातून दोनदा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
त्वचेसाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबाचा तुकडा घेऊन त्यावर बेकिंग सोडा टाकून नाकावरील व्हाईटहेडला चोळा. त्यानंतर ५ मिनिटं लिंबू व्यवस्थित नाकावर घासून घ्या. यामुळे नाकावरील व्हाईटहेड निघून त्वचा स्वच्छ होईल.