हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:
वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. पावसाळ्याचे दिवस सुरु असून सुद्धा काही ऊन तर कधी पाऊस पडत आहे. सतत वातावरणात होण्याऱ्या बदलांमुळे आरोग्यसुद्धा पूर्णपणे बिघडून गेले आहे. चेहऱ्याच्या त्वचेसोबतच हातांची आणि बोटांची त्वचा सुद्धा खरखरीत होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेसमास्क किंवा फेसपॅक लावणे आवश्यक आहे. यामुळे खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यासोबतच बोटांच्या त्वचेसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभर काम केल्यानंतर हातांच्या बोटांना क्रीम किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावण्यास विसर पडतो.(फोटो सौजन्य-istock)
बोटांच्या त्वचेची काळजी योग्यरीत्या घेतली नाहीतर हात खूप जाड आणि रखरखीत होऊन जातात. त्यामुळे सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी अभिनेत्री रविना टंडन हिने सोशल मिडियावर हातांवरील टॅनिंग काढण्यासाठी रेसिपी शेअर केली आहे. हात मुलायम आणि सुंदर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त आणि महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करण्यास प्राधान्य दिले आहे.घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. टॅन किंवा खरखरीत झालेली त्वचा तुम्ही घरगुती उपाय करून सुधारू शकता.
हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:
हे देखील वाचा: चहाच्या पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, केसांमध्ये येईल चमक
अभिनेत्री रविना टंडन तिच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तिने नुकतच हातांवरील आणि बोटांवरील टॅन काढण्यासाठी घरगुती उपाय सांगितला आहे. यासाठी एका वाटीमध्ये 2 किंवा 3 चमचे ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात 1 चमचे मीठ मिक्स करा. या मिश्रणाची पेस्ट तयार करून झाल्यानंतर हातांना पाठून पुढून व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने 15 मिनिटं मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर २ मिनिटं हातांना लावलेले मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात हात टाकून हात स्वच्छ करा. पण जर तुमच्या हाताला किंवा बोटांना कुठेही जखम झाली असेल तर हा उपाय करू नये. असे केल्यास जखम आणखीन चिघळू शकते.