दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय:
दात स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा दात स्वच्छ दिसत नाही. तेलकट किंवा गोड पदार्थांच्या सेवनानंतर दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र असे फार कमी लोक करतात. दातांवरब साचून राहिलेल्या पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थरामुळे चारचौघांमध्ये हसणे किंवा बोलणे कठीण होऊन जाते. अशावेळी अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अस्वच्छ दातांमुळे तोंडाला दुर्गंधी येणे, दातांवर पिवळ्या रंगाचा थर साचून राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात, मात्र तरीसुद्धा काहीवेळा दात स्वच्छ होत नाहीत. त्यामुळेदातांवर साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
प्रत्येक भारतीय घरांमध्ये केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि चमकदार केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. केसांना खोबरेल तेल लावल्यामुळे केसांची मूळ निरोगी राहतात. पण खोबरेल तेलाचे इतरही अनेक फायदे आहेत. हे तेल नॅचरल मॉइश्चरायजर म्हणून केसांवर आणि त्वचेवर काम करते. अनेक लोक खोबरेल तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी करतात. तसेच खोबरेल तेल तोंडातून येणारी दुर्गंधी कायमची घालवण्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहितीसांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दातांवर साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता. यासाठी 2 ते 3 थेंब खोबरेल तेल तोंडात टाकून 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर तोंडामध्ये सगळीकडदे व्यवस्थित फिरवून घ्या. यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये अडकून राहिलेली सर्व घाण निघून जाईल आणि दात स्वच्छ होतील. हा उपाय करताना तेल थुकू नये शिवाय तेल गिळूसुद्धा नका. 20 मिनिटं तेल तोंडात ठेवून झाल्यानंतर थुकून टाका. 20 मिनिटांनी गुळणी करून तेल थुंऊन टाका. यामुळे दातांवरील पिवळा थर स्वच्छ होण्यास मदत होईल.
खोबरेल तेलामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-मायक्रोबिअल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे तोंडात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. यामुळे तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन जातात आणि तोंडाचे आरोग्य सुधारते. आठवड्यातून दोनदा खोबरेल तेलाच्या गुळण्या केल्यामुळे दात आणि हिरड्या स्वच्छ होण्यास मदत होते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
हळदीमध्ये आढळून येणारे गुणधर्म तोंडामधील दुर्गंधी घालवण्यासाठी मदत करतात. वाटीमध्ये हळद आणि खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट दातांवर लावून दात स्वच्छ करून घ्या. यामुळे दातांवरील घाण स्वच्छ होईल आणि दात चमकदार आणि निरोगी दिसतील. हा उपाय केल्यामुळे श्वासाची दुर्गंधी नाहीशी होईल. हळदीमध्येही अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-सेप्टिक गुणधर्म आढळून येतात.