सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय
हिवाळ्यामध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी, कंबर दुखी, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. हाडांमधील वेदना वाढू लागल्यानंतर काहीवेळा अस्वस्थ वाटू लागते. शिवाय चालताना किंवा बसताना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये होणाऱ्या सांधेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
सतत काम करून थकल्यानंतर शरीराला झोपेची आवश्यकता असते. झोपल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे. शांत झोपेमुळे शरीर आणि मनाला अनेक फायदे होतात. सांधे निरोगी राहण्यासाठी नियमित ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी झोप घेणे आवश्यक आहे. संधिवाताची समस्या असलेल्या लोकांना थंडीच्या दिवसांमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आहारात फळे, भाज्या, ड्रायफ्रुटस इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेली सर्व विटामिन्स मिळतील. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास हाडांना फायदा होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या वेळी जास्त थंडी असते. अशावेळी सूर्याची वाट सगळेच पाहत असतात. पण या दिवसांमध्ये ऊन खूप उशिराने येते. त्यामुळे कामाच्या धावपळीत सूर्यकिरण अंगावर पडताच नाही, ज्यामुळे शरीरात विटामिन डी ची कमतरता जाणवते. शरीरात विटामिन डी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर संधिवाताची समस्या आणखीन जास्त तीव्र होत जाते, ज्यामुळे सतत सांधे दुखू लागतात. शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशात जावे.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाशिवाय योग, पोहणे आणि सायकलिंग इत्यादी क्रिया करून तुम्ही शारीरिक हालचाली करू शकता. तसेच नेहमीच्या वापरात उबदार कपड्यांचा वापर करा. ज्यामुळे शरीराला उष्णता मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कमी होत जाते. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वाढलेल्या वजनामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण येते, ज्यामुळे हाड दुखू लागतात.